---Advertisement---

फिफा विश्वचषक: बेल्जियम विरुद्ध ब्राझील…आज चुकीला माफी नाही!

---Advertisement---

रशिया।  फिफा विश्वचषक2018चा उपांत्यपूर्व फेरीतील आजचा (6जुलै) दुसरा सामना ब्राझिल विरुद्ध बेल्जियम असा रंगणार आहे. कझालन येथे होणाऱ्या या सामन्याला रात्री 11.30 सुरूवात होणार आहे.

हे दोन संघ याआधी चार वेळा एकमेकांच्या विरुद्ध खेळले आहेत. यातील 1963ला झालेला मैत्रीपुर्व सामना बेल्जियमने जिंकला तर उर्वरीत तीन सामन्यात ब्राझिलने बाजी मारली.

हे दोन संघ 2002च्या विश्वचषकातील बाद फेरीत आमने-सामने खेळले होते. यामध्ये ब्राझिलने बेल्जियमचा 2-1असा पराभव केला होता.

फिफा विश्वचषकात दक्षिण अमेरिकेविरुद्ध खेळताना बेल्जियम 4 पैकी 3 सामन्यात पराभूत झाला आहे.

या स्पर्धेत बेल्जियमचे सर्वाधिक गोल

तसेच या विश्वचषकात बेल्जियम संघाने सर्वाधिक असे 12 गोल केले असून ते पहिल्या स्थानावर आहे. तर ब्राझिल 7 गोलसह पाचव्या स्थानावर आहे.

बेल्जियम 1930ला पहिला तर 2014 ला शेवटचा फिफा विश्वचषक खेळला आहे. 1986च्या विश्वचषकातील त्यांची आतापर्यंतची उत्तम कामगिरी ठरली. या विश्वचषकात ते चौथ्या स्थानी होते.

तसेच ते एकदाच उपांत्य फेरीत पोहोचले होते. त्यांचा स्टार फुटबॉलपटू
एडीन हझार्ड हा त्याच्या चपळाई आणि कौशल्याने गोल करण्यात प्रसिद्ध आहे. चेलसा क्लबकडून खेळणाऱ्या या फुटबॉलपटूने विश्वचषकाच्या पात्रता फेरीत 6 गोल केले होते.

पाच वेळा फिफा विश्वचषक जिंकणारा ब्राझिल 11 वेळा उपांत्य तर 7 वेळा अंतिम सामन्यात खेळला आहे.

आता या स्पर्धेत ब्राझिल ज्या स्थानावर खेळत आहे त्या स्थानावर खेळताना ते फक्त दोनदाच पराभूत झाले आहे. त्यापैकी पहिला पराभव 2006ला फ्रान्स विरुद्ध आणि दुसरा पराभव 2010ला नेदरलॅंड विरुद्ध झाला होता.

मागील तीन स्पर्धांपासून ब्राझिल युरोपियन संघाविरुद्ध खेळताना बाहेर पडला आहे (2006ला फ्रान्स विरुद्ध, 2010ला नेदरलॅंड विरुद्ध आणि 2014ला जर्मनी विरुद्ध).

फिफा कॉन्फिडरेशन चषक विजेता आणि ऑलिंपिकचे सुवर्ण पदक मिळवणारा नेमार हा त्याचा दुसरा विश्वचषक खेळत आहे.

तसेच 2015चे फिफा क्लब विश्वचषक जिंकणाऱ्या बार्सिलोना संघात हा पॅरीस सेंट जर्मेनचा

स्टार फुटबॉलपटू होता.

रोमेलू लुकारू सर्वाधिक गोल करणाऱ्यामध्ये दुसऱ्या स्थानावर

बेल्जियमच्या रोमेलू लुकारूने या स्पर्धेत 3 सामन्यात 4गोल केले असून तो या स्पर्धेत सर्वाधिक गोल करणाऱ्यामध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंडचा हॅरी केन 6 गोलसह पहिल्या स्थानावर आहे.

फिफा क्रमवारीत बेल्जियम 3ऱ्या आणि ब्राझिल 2ऱ्या क्रमांकावर आहे.

संभावित संघ-

ब्राझिल-  अलीसन, फॅंगेनर, थियगो सिल्वा, मिरांडा, फिलिप लुइस / मार्सिलो, फरनॅनडीन्हो, पौलीन्हो, विलीयन, फिलीप काउंटीन्हो, नेमार, गॅब्रियल जेसस

बेल्जियम- थिबाउट कोर्टॉइस, जॅन व्हर्टॉन्गें, व्हिन्सेंट कॉम्पानी, टोबी अॅल्डरवीरल्ड,
एक्सेल विस्सेल, केविन डी ब्रुने, चाडली नासरे, थॉमस मेयुएर, मारुउने फेलेनी, इडन हॅझर्ड, रोमेलू लुकारू

महत्त्वाच्या बातम्या:

-असा काय विक्रम गोलंदाजीत झालायं ज्याची जगभरात आहे चर्चा!

-विशेष मुलाखत- शिव छत्रपती पुरस्कार मिळाला की कबड्डी कारकीर्दीचं सार्थक झालं असं समजेन- गिरीश इरनक

-विंबल्डनचे चाहते आहात? मग या १० गोष्टी माहित असायलाच हव्यात..  

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment