रशिया। फिफा विश्वचषकातील पहिल्या सामन्यात यजमान रशियाने सौदी अरबवर 5-0 असा मोठा विजय मिळवला. हा 1954 नंतर सुरूवातीच्या सामन्यातील पहिला मोठा विजय ठरला.
1954च्या विश्वचषकात ब्राझिलने मेक्सिकोला 5-0ने पराभूत केले होते.
आजचा सामना दोन वेळेचा फिफा विश्वचषक विजेता उरूग्वे विरूद्ध इजिप्त असा आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार सांयकाळी 5.30 सुरू होणार आहे.
एकटरिनबर्ग येथे हा सामना होणार आहे. याचबरोबर या स्टेडियमवर अजून तीन सामने होणार आहे. 21जूनला फ्रांस विरूद्ध पेरू, 24 जून जपान विरूद्ध सेनेगल आणि 27 जून मेक्सिको विरूद्ध स्वीडन असे ह्या स्टेडियमवरील उर्वरीत सामने आहे.
हा इजिप्तचा तिसरा विश्वचषक आहे. याआधी ते 1934 आणि 1990ला विश्वचषक खेळले आहे.
इजिप्तची पुर्ण मदार स्टार फुटबाॅलपटू आणि लिव्हरपूल संघाचा स्ट्रायकर मोहम्मद सालाह याच्यावर आहे.
मात्र यूईएफए चॅम्पीयन्स लीगच्या अंतिम सामन्यात खेळताना सालाहच्या खांद्याला दुखापत झाली होती. सालाह आता फीट असून त्याने संघासोबत सरावही केला.
उरूग्वेने 1930 आणि 1950 असे दोन विश्वचषक जिंकले आहे.
तसेच 1970च्या विजयानंतर उरूग्वे विश्वचषकातील सुरूवातीचा सामना कधीही जिंकलेला नाही. या 48 वर्षांत त्यांना 3 अनिर्णीत आणि 3 पराभवाचा सामना करावा लागला आहे.
उरूग्वे आणि बार्सिलोना स्टार फुटबॉलपटू फॉरवर्ड लुईस सुवारेजने विश्वचषकाचे 8 सामने खेळले असून यामध्ये त्याने 5 गोल नोंदवले आहेत.
एडिसन कवानीने 10 गोल केल्याने त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे. तसेच सुवारेज आणि कवानी या दोघांनी मिळून 93 आतंरराष्ट्रीय गोल केले आहेत.
प्रशिक्षकामध्ये इजिप्तचे हेक्टर कूपर यांचा हा पहिलाच विश्वचषक आहे तर उरूग्वेच्या ऑस्कर तरबेज यांचा हा चौथा विश्वचषक आहे.
इजिप्त आणि उरूग्वे हे कधीही विश्वचषकात आमने-सामने आले नाही.
याआधी 2006ला हे दोन संघ अलेग्ज़ॅंड्रिया येथे विरोधात खेळले होते. या सामन्यात उरूग्वेने इजिप्तला 2-0 ने पराभूत केले होते.
महत्त्वाच्या बातम्या:
–कोण आणि कसे ठरवतात फुटबाॅल विश्वचषकाचे आयोजक देश?
–फिफा विश्वचषक २०१८- ओळख ई गटाची