सध्या जबदस्त फॉर्ममध्ये असलेली भारतीय महिला संघाची कर्णधार आणि दिग्गज फलंदाज मिताली राजने श्रीलंकेविरुद्ध महिला विश्वचषकात दणदणीत अर्धशतक झळकावले. भारतीय सलामीची फळी कोलमडल्यानंतर दीप्ती शर्मा आणि कर्णधार मिताली राज यांनी डाव सावरत अर्धशतकी खेळी केल्या.
महिला विश्वचषकातील ही मितालीची चार सामन्यात तिसरी अर्धशतकी खेळी असून गेल्या ९ सामन्यात ८ अर्धशतकी खेळी केल्या आहेत. हे मिताली राजच एकदिवसीय क्रिकेटमधील ४८ व अर्धशतक आहे. विशेष म्हणजे तिला एकदिवसीय महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी अव्वल खेळाडू बनण्यासाठी आता फक्त ३६ धावांची गरज आहे.
दीप्ती शर्माने भारतीय डावाला आकार देताना १०९ चेंडूत ७८ धावांवर बाद झाली. सध्या भारताचे ३७ षटकात १५२ धावा झाल्या असून सलामीवीर पूनम राऊत १६ धावांवर तर स्म्रिती मंधाना ८ धावांवर बाद झाले.
FIFTY! #MithaliRaj gets her 48th ODI half-century for India! @M_Raj03#SLvIND #WWC17 pic.twitter.com/lF5Qks5J5Q
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) July 5, 2017