कोलंबो: येथे चालू असलेल्या श्रीलंका विरुद्ध भारत दुसऱ्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी भारत मजबूत स्थितीत आहे. भारतीय यष्टिरक्षक वृद्धिमान सहाने आज अश्विन पाठोपाठ येथे अर्धशतक झळकावले.
सहाच हे कसोटीमधील ५वे अर्धशतक असून भारताकडून या पहिल्या डावात केएल राहुल, आर अश्विन यांनी अर्धशतके तर अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांनी शतके केली आहेत.
भारताने ५०० धावांचा टप्पा पार केला असून सध्या भारत ५२५/७ अशा सुस्थितीत आहे.