कोलंबो येथे चालू असलेल्या श्रीलंका विरुद्ध भारत दुसऱ्या कसोटी सामन्यात भारत आता मजबूत स्थितीत आहे. के एल राहुल नंतर आता भारताच्या उपकर्णधाराने म्हणजेच अजिंक्य रहाणेनेही अर्धशतक लगावले आहे. हे अजिंक्य राहणेच्या कसोटी कारकिर्दीतील १३वे अर्धशकत आहे.
याच मालिकेत रहाणेला आणखीन एक वैयक्तिक विक्रम करण्याची संधी आहे ते म्हणजे तो म्हणजे आपल्या कसोटी कारकिर्दीत ३००० धावा पूर्ण करण्याचा.
रहाणेने आतापर्यंतच्या कसोटी कारकिर्दीत २७१६धावा केल्या आहेत, ज्यात त्याची सरासरी ४७ ची आहे.
आता भारताला या नवीन मिस्टर डिपेंडेबलकडून शतकाची अपेक्षा आहे आणि जर त्याने तसे केले तर भारत पहिल्या डावात धावांचा डोंगर रचेल हे नक्की.