शनिवारी (दि. 14 ऑक्टोबर) विश्वचषक 2023 स्पर्धेतील 12वा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान संघात खेळला गेला. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर पार पडलेल्या या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा 7 विकेट्सने दारुण पराभव केला. सातत्याने चर्चा होत आहे. असे असतानाच या सामन्यादरम्यान एका छातीने थेट महिला कॉन्स्टेबलवर हात उचलण्याचा व्हिडिओ समोर आला.
SHAME ON YOU AHMEDABAD!👊 This is the reality of Ahmedabad crowd. They feel no hesitation to beat a female police officer. How can you expect them to respect Pakistan Cricket Team. #cwc23 pic.twitter.com/JQfxuUbjG0
— Arfa Feroz Zake (@ArfaSays_) October 15, 2023
या बहुचर्चित सामन्यासाठी मैदानात मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था केली गेली होती. तब्बल अकरा हजार पेक्षा जास्त सुरक्षाकर्मी मैदानात होते. मैदानातील सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये एक महिला पोलीस कर्मचारी व एका चाहत्यामध्ये मोठा वाद झाल्याचे पाहायला मिळाले. सुरुवातीला दोघांमध्ये बाचाबाची झाल्यानंतर महिला कर्मचाऱ्याने त्या चाहत्याच्या कानशिलात लगावली. त्यानंतर त्या चाहत्याने देखील कोणताही विचार न करता त्या महिला कर्मचाऱ्यावर हात उगारला. त्याला इतरांनी थांबवण्याचा प्रयत्न केला.
या सामन्याचा विचार केल्यास भारताने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. भारताच्या सर्वच गोलंदाजांनी दमदार कामगिरी करत पाकिस्तानचा डाव 191 धावांवर गुंडाळला. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा व श्रेयस अय्यर यांनी अर्धशतके करत भारतीय संघाला सात गडी राखून मोठा विजय मिळवून दिला. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
(Fight Between Women Police And Fan In Narendra Modi Stadium In India Pakistan Match)
हेही वाचा-
‘हा तर फुसका बॉम्ब, मोठ्या पोरांनी…’, भारताच्या विजयानंतर सेहवागची लक्षवेधी पोस्ट
लाईव्ह सामन्यातच शास्त्रींनी केले आफ्रिदीला ट्रोल; म्हणाले, ‘तो काय वसीम अक्रम नाही, त्याला हवेत…’