---Advertisement---

FIH Pro League: बेल्जियमकडून भारत पराभूत, शेवटच्या क्षणी केलेल्या चुका टीम इंडियाला पडल्या भारी

On: गुरूवार, फेब्रुवारी 12, 2026 10:16 AM
---Advertisement---

ओडिशाच्या राउरकेला येथे पुरूष हॉकी संघांची एफआयएस प्रो लीग २०२५-२६ सुरू आहे. यामध्ये बुधवारी (११ फेब्रुवारी) भारत विरुद्ध बेल्जियम सामना खेळला गेला. बिरसा मुंडा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सा सामन्यात बेल्जियमने भारताला ३-१ असे पराभूत केले. यामध्ये भारताकडून तो एकमात्र गोल शिलानंद लाकरा याने केला. बेल्जियमकडून नेल्सन ओनाना, थॉमस क्रोल्स आणि अर्नो वान डेसेल यांनी गोल केले.

पहिल्या सत्राचा खेळ सुरू झाला असता दोन्ही संघांच्या बचाव फळीने एकही चूक न करता गोल होण्यापासून रोकले होते. यामध्ये बेल्जियमला चौथ्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला, मात्र अलेक्झांडर हेंडरिक्सच्या ड्रॅग फ्लिकला भारताच्या विवेक सागर प्रसादने अडवले. येथे भारतालाही पेनाल्टी कॉर्नर मिळाल, मात्र तो वाया गेला. यामध्ये बेल्जियमचा चेंडूवर सर्वाधिक ताबा दिसला, भारतानेही हार न मानता त्यांचे प्रयत्न सुरूच ठेवले. बेल्जियमला १४व्या मिनिटाला पेनाल्टी कॉर्नर मिळाला, मात्र टॉम बूनचा तो शॉट बाहेर गेला. या पहिल्या १५ मिनिटांमध्ये एकही गोल न झाल्याने दोन्ही संघ ०-० असे बरोबरीत होते.

दुसऱ्या सत्रात दोन्ही संघ आक्रमक दिसले. २१व्या मिनिटाला पुन्हा एकदा बेल्जियमला पेनाल्टी कॉर्नर मिळाला, हेंडरिक्सच्या त्या शॉटला भारताचा गोलकिपर पवनने उत्तमरित्या थांबवले. सामन्यात बेल्जियमने पहिला गोल केला. २३व्या मिनिटाला क्रोल्सच्या पासवर ओनानाने गोल केला आणि १-० अशी आघाडी घेतली. भारतानेही मागे न राहता २९व्या मिनिटाला पेनाल्टी कॉर्नर मिळवला आणि त्यावर लाकराने गोल केला.

तिसऱ्या सत्रातही दोन्ही संघ १-१ असे बरोबरीत होते, मात्र चौथ्या सत्रात बेल्जियम अधिक लयीत दिसला. यामध्ये भारताकडून अनेक चुकाही झाल्या. बेल्जियमकडून ५३व्या मिनिटाला क्रोल्सने आणि ५७व्या मिनिटाला डेसेलने गोल करत सामना जिंकला. भारताचा हा या स्पर्धेतील पहिलाच सामना होता. पराभवाने सुरूवात झाल्यानंतर यजमान संघ दुसऱ्या सामन्यात चांगली कामगिरी करतील अशी अपेक्षा आहे. यामध्ये भारताचा पुढील सामना आज अर्जेंटिनाविरुद्ध आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---