पुणे, दि.2 जुलै 2023 – पीवायसी हिंदू जिमखाना आयोजित पीवायसी रिअल्टी सेव्हन चेस लीग स्पर्धेत सातव्या फेरी अखेर मराठा वॉरियर्स, किंग्ज 64 या संघांनी आघाडी कायम ठेवत अंतिम फेरीत प्रवेश केला.
पीवायसी जिमखाना येथील बुद्धिबळ संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेत सातव्या फेरी अखेर मराठा वॉरियर्स संघाने 23 गुणांसह आघाडी प्राप्त करत अंतिम फेरी गाठली. अखेरच्या लीग फेरीत मराठा वॉरियर्स संघाने विझार्ड्स संघाला बरोबरीत रोखले. अन्य लढतीत रोहित देवल, अश्विन त्रिमल, आदित्य लाखे, आदित्य भट, अभिषेक देशपांडे यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर किंग्ज 64 संघाने नेव्हिगेटर्स संघाचा पराभव करून आगेकूच केली. किंग्ज 64 संघाने 22.5 गुणांसह अंतिम फेरीत प्रवेश केला. (Final match between Maratha Warriors and Kings 64 in PYC Realty Seven Chess League Tournament)
स्पर्धेचा सविस्तर निकाल: राऊंड रॉबिन फेरी: सातवी फेरी:
नेव्हिगेटर्स(1गुण) पराभुत वि.किंग्ज 64(5गुण)
निखिल चितळे(0गुण) पराभुत वि.रोहित देवल(1गुण);
अनिका फडके (0गुण) पराभुत वि.अश्विन त्रिमल(1गुण);
बाळ कुलकर्णी (0गुण) पराभुत वि. आदित्य लाखे(1गुण);
सलिल गुप्ते(0गुण) पराभुत वि.आदित्य भट(1गुण);
अमृता देवगावकर(1गुण)वि. वि.निरन भुरट(0गुण);
आमीर आजगावकर(0गुण) पराभुत वि.अभिषेक देशपांडे(1गुण);
7 नाईट्स(4गुण) वि.वि.गोल्डन किंग्ज(2गुण)
प्रियदर्शन डुंबरे(1गुण) वि.वि. निरंजन गोडबोले(0गुण);
केतन देवल(1गुण) वि.वि. ईशान लागु(0गुण);
रोहीन लागु(1गुण)वि.वि. शुभांकर मेनन (0गुण);
राजवीर पल्लोड(0गुण) पराभुत वि.आरव श्रॉफ(1गुण);
सायेशा खिंवसरा(0गुण) पराभुत वि. रूचा मुजुमदार(1गुण);
नितीन गोरे (1गुण)वि.वि.अनंत सस्त्रबुद्धे(0गुण);
विझार्ड्स(3गुण) बरोबरी वि. मराठा वॉरियर्स(3गुण)
अक्षय साठे(0गुण) पराभुत वि. परम जालन(1गुण);
चारूदत्त साठे(1गुण)वि.वि. गौतम गोवित्रीकर(0गुण);
शुभांकर भजेकर(1गुण)वि.वि. अर्णव कुंटे(0गुण);
मेहुल सुर्वे (0गुण) पराभुत वि. इशान तळवळकर(1गुण);
अनिल कुलकर्णी(0गुण) पराभुत वि. आदित्यवर्धन त्रिमल(1गुण);
निशादचौगुले(1गुण) वि.वि. नेहा लागु(0गुण).
महत्वाच्या बातम्या –
पीवायसी रिअल्टी सेव्हन चेस लीग स्पर्धेत तिसऱ्या फेरीअखेर मराठा वॉरियर्स आघाडीवर
वानखेडेवर रंगणार 2011 वर्ल्डकप फायनलचा रिमेक! असे आहे श्रीलंका संघाचे वेळापत्रक