अहमदनगर पेरियार पँथर्स विरुद्ध ठाणे हम्पी हिरोज यांच्यात लढत झाली. अहमदनगर ने पहिले स्थान सुनिश्चित केला होता. तर ठाणे संघ हा सामना जिंकून पाचव्या स्थानावर जाण्यासाठी प्रयत्न करणार होता. दोन्ही संघांनी अतिशय संथ सुरुवात केली होती. पहिल्या पाच मिनिटांतर 2-2 असा सामना सुरू होता. प्रफुल झवारे च्या आक्रमक चढाया व संकेत खलाटे च्या जबरदस्त पकडीनी अहमदनगर संघाने ठाणे संघावर लोन पाडला.
मध्यांतरपूर्वी ठाणे संघाने चांगला खेळ करत पिछाडी कमी करत मध्यांतरला ठाणे संघ 10-14 असा पिछाडीवर होता. मध्यांतरनंतर ही दोन्ही संघांनी तिसऱ्या चढाईवर खेळण्याची भूमिका घेतली होती. सामन्याची 13 मिनिटं शिल्लक असताना ठाणे संघाने अहमदनगर संघाला ऑल आऊट करत सामना 17-17 असा बरोबरीत आणला. त्यानंतर काही वेळ सामना बरोबरीतच सुरू होता. मात्र त्यानंतर विघ्नेश चौधरी व मंगेश सोनवणे यांच्या चतुरस्त्र चढायांनी अहमदन गर संघाला संघाला पुन्हा एकदा ऑल आऊट केले.
अहमदनगर संघाला ऑल आऊट केल्या नंतर ठाणे संघाने आपली आघाडी कायम ठेवत सामना 31-21 असा जिंकला. स्पर्धेत 13 सामन्यात अपराजीत राहिलेल्या अहमदनगर संघाला पहिला पराभव स्वीकारावा लागला. ठाणे कडून विघ्नेश चौधरी ने 7 तर मंगेश सोनावणे ने 6 गुण मिळवले. अहमद इनामदार ने 4 पकडी केल्या तर इतर बचावफळी ने सुद्धा पकडी करत महत्वाची भूमिका निभावली. या विजयाने ठाणे संघाने गुणतालिकेत पाचवे स्थान निश्चित केले. (Finally, Thane Hampi Heroes team stopped the winning chariot of Ahmednagar team)
बेस्ट रेडर- विघ्नेश चौधरी, ठाणे हम्पी हिरोज
बेस्ट डिफेंडर- अहमद इनामदार, ठाणे हम्पी हिरोज
कबड्डी का कमाल- मंगेश सोनावणे, ठाणे हम्पी हिरोज
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
प्रमोशन फेरीत मुंबई शहर मौर्य मेवरीक्स संघाचा चौथा विजय
के.एम.पी. युवा कबड्डी सिरीज च्या अंतिम फेरी पर्यंतचा असा असेल प्रवास