भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात पुढच्या महिन्यात आमना सामना होणार आहे. बीसीसीआयने शुक्रवारी (23 जून) वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी आणि वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. उभय संघांतील पाच सामन्यांची टी-20 मालिकाही खेळली जाणार आहे. मात्र, अद्यात त्यासाठी संघ समोर आला नाहीये. वेस्ट इंडीज दौरा पुणेकर ऋतुराज गायकवाड याच्यासाठी खास ठरू शकतो.
सध्या महाराष्ट्र प्रीमियर लीग खेळत असलेला ऋतुराज पुढच्या महिन्यात थेट वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी रवाना होईल. एमपीएल 2023 पूर्वी जूनच्या पहिल्या आठवड्यात ऋतुराज लग्नबंधनात अडकला होता. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळला गेला. ऋतुराजला देखील या सामन्यासाठी निवडले गेले होते. पण त्याच्या लग्नामुळे तो या महत्वाच्या सामन्याला मुकला होता. पण यावेळी वेस्ट इंडीज दौऱ्यात त्याचे कसोटी पदार्पण निश्चित मानले जात आहे. ही कसोटी मालिका 12 ते 24 जुलैदरम्यान खेळली जाणार आहे.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघातील प्रमुख बदलांपैकी एक म्हणजे ऋतुराजला संघात घेणे. नियमित सलामीवीर केएल राहुल संघातून बाहेर असल्यामुळे ऋतुराज या मालिकेत भारतासाठी डावाची सुरुवात करू शकतो. दुसरीकडे संघाचे उपकर्णधारपद अजिंक्य रहाणेकडे पुन्हा एकदा सोपवण्यात आले आहे. काउंटी क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडल्यानंतर पुजारा पुन्हा एकदा कसोटी क्रिकेटमध्ये अपयशी ठरला. डब्ल्यूटीसी फायनलमध्ये त्याला संघासाठी अपेक्षित खेळी करता आली नाही. असात पुजाराला बाहेर करू संघ व्यवस्थापनाने अजिंक्य रहाणेला संघआत स्थान दिले आहे. कर्णधारपद रोहित शर्माकडे कायम आहे. (Finally, the door of the Test team opened for Rituraj! Golden opportunity for West Indies tour)
वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी भारताचा कसोटी संघ
रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी.
वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी भारताचा वनडे संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, मुकेश कुमार.
भारत विरुद्ध वेस्ट इंडीज कसोटी मालिकेचे वेळापत्रक
पहिला सामना – 12 ते 16 जुलै
दुसरा सामना – 20 ते 24 जुलै
भारत विरुद्ध वेस्ट इंडीज वनडे मालिका
पहिला सामना – 27 जुलै
दुसरा सामना – 29 जुलै
तिसरा सामना – 1 ऑगस्ट
भारत विरुद्ध वेस्ट इंडीज टी-20 मालिका
पहिला सामना – 3 ऑगस्ट
दुसरा सामना – 6 ऑगस्ट
तिसरा सामना – 8 ऑगस्ट
चौथा सामना – 12 ऑगस्ट
पाचवा सामना – 13 ऑगस्ट
महत्वाच्या बातम्या –
पुजाराची कसोटी संघातून हकालपट्टी! ‘या’ युवा खेळाडूंमध्ये बीसीसीआय शोधतेय भविष्य
मोठी बातमी: ‘अजिंक्य’ रहाणे पुन्हा बनला टीम इंडियाचा उपकर्णधार, दीड वर्षानंतर पुनरागमन करताच मिळाली जबाबदारी