भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार व वरिष्ठ फलंदाज विराट कोहली मागील जवळपास दोन वर्षापासून खराब फॉर्मशी झुंजत आहे. तो चांगली सुरुवात केल्यानंतर मोठी खेळी करण्यात अपयशी ठरतोय. तब्बल १००० पेक्षा जास्त दिवसांपासून त्याने आंतरराष्ट्रीय शतक झळकावले नाही. विराटला या खराब फॉर्ममधून बाहेर येण्यासाठी अनेक माजी क्रिकेटपटू सल्ला देत आहेत. आपल्या फॉर्मच्या या सर्व चर्चांवर आता स्वतः विराटनेच प्रतिक्रिया दिली आहे.
आशिया चषकासाठी रवाना होण्यापूर्वी विराटने प्रसारण वाहिनीला मुलाखत दिली. यामध्ये तो अनेक मुद्द्यांवर भरभरून बोलला. विराट म्हणाला,
“माझा खेळ सध्या कुठे आहे हे मला माहीत आहे. परिस्थितीचा सामना करण्याची आणि विविध प्रकारची गोलंदाजी खेळण्याची क्षमता असल्याशिवाय तुम्ही तुमच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत इतक्या पुढे जाऊ शकत नाही. चांगल्या खेळाची पुन्हा एकदा सुरुवात करण्यासाठी ही एक सोपी पायरी आहे. मला यातून शिकायचे आहे आणि मला समजून घ्यायचे आहे की, एक खेळाडू आणि एक माणूस म्हणून माझी मूलभूत मूल्ये काय आहेत?”
विराट यालाच जोडून पुढे म्हणाला,
“मला माहित आहे की, चढ-उतार प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात. मात्र, हा अनुभव खूप काही सांगून जातो.”
विराट कोहली आयपीएलनंतर केवळ इंग्लंड दौऱ्यावर स्पर्धात्मक क्रिकेट खेळला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मायदेशातील मालिका, वेस्ट इंडिज दौऱ्यावरही तो सहभागी झाला नव्हता. आता तो थेट आशिया चषकात खेळताना दिसेल. त्याचा हाच फॉर्म आशिया चषकात राहिला तर, टी२० विश्वचषकासाठी त्याचा संघात समावेश होईल की नाही याबाबत प्रश्नचिन्ह आहे. कारण, संधी मिळत असलेले इतर युवा खेळाडू मी जागा घेण्यासाठी तयार दिसत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
बांगलादेशच घोडं आशिया कप आधीच अडल! एका पाठोपाठ तीन मॅचविनर स्पर्धेतून बाहेर
‘गिलने धवनची चिंता वाढवली! पण…’ माजी दिगग्जाने सांगितले
संघात बुमराह-शमी नसतील तेव्हा ‘त्याला’ संधी द्या! माजी दिग्गज गोलंदाजाने दिलाय मोलाचा सल्ला