Friday, February 3, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राष्ट्रकुल विजेता लक्ष सेन संकटात! गंभीर प्रकरणात एफआयआर दाखल

December 3, 2022
in टॉप बातम्या, बॅडमिंटन
Lakshya Sen

Photo Courtesy: Twitter


नुकताच प्रतिष्ठेचा अर्जुन पुरस्कार जिंकलेला राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता युवा बॅडमिंटनपटू लक्ष सेन आता संकटात सापडला आहे. बेंगलोरमध्ये त्याच्याविरुद्ध तसेच त्याच्या प्रशिक्षकांविरुद्ध वय लपवल्याची‌ तक्रार दाखल केली गेली आहे. लक्ष याने आपल्या वयाचा खोटा दाखला सादर केला होता असे या तक्रारीत म्हटले असून, लक्ष याच्याकडून अद्याप याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, बेंगलोरमध्ये बॅडमिंटन अकादमी चालवणाऱ्या नागराजा एमजी यांनी ही तक्रार केली आहे. या तक्रारीनुसार, लक्ष सेन व तो सराव करत असलेल्या प्रकाश पदुकोन अकादमीतील प्रशिक्षक विमल कुमार यांच्या विरोधात पोलिसात ही तक्रार दाखल केली. दाखल केलेल्या एफआयआरमध्ये भारतीय दंड संहितेच्या कलम 420 फसवणूक, कलम 468 खोटी कागदपत्रे बाळगणे व कलम 471 खोटे दस्त बनवणे या कलमांचा समावेश आहे. या एफआयआरमध्ये लक्ष व विमल कुमार यांच्याव्यतिरिक्त त्याची आई निर्मला, वडील धीरेंद्र व भाऊ चिराग यांचेही नाव आहे.

नागराजा यांनी या तक्रारीत म्हटले आहे, 2010 मध्ये लक्षचे पालक व प्रशिक्षक यांनी खोटा जन्माचा दाखला बनवला होता. त्यामुळे तो विविध स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी पात्र होत होता. या जन्मदाखल्याप्रमाणे त्याची जन्मतारीख 2001 दिसते. मात्र, त्याची खरी जन्मतारीख 1998 सालची आहे.

लक्ष हा सध्या भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू आहे. यावर्षी बर्मिंगहॅम येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत त्याने पुरुष एकेरीचे सुवर्णपदक जिंकले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावरील त्याच्या अशाच सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याला यावर्षी भारतीय क्रीडा क्षेत्रातील मानाचा अर्जुन पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

(FIR Against Arjuna Awardee Badminton Player Lakshya Sen For Age Fraud)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हे अस कुठं असतंय व्हय? चेंडू चमकवण्यासाठी रुटने लढवली अनोखी शक्कल, सहकाऱ्याच्या डोक्याचा केला वापर
रावळपिंडीत विक्रमांची रांग! कसोटीच्या इतिहासात चारही सलामीवीरांनी रचला इतिहास


Next Post
Imam Ul Haq & Abdullah Shafique

इंग्लंड दिग्गजाच्या 'त्या' ट्वीटवर पाकिस्तानी चाहते भडकले! म्हणाले, 'काल पण हीच पीच होती ज्यावर...'

BCCI

नवे निवडसमिती अध्यक्ष म्हणून या दिग्गजाचे नाव आघाडीवर; वेळोवेळी मोठे केलेय देशाचे नाव

Deepak Chahar and Rohit Sharma

भारतीय क्रिकेटर अन्नापासून वंचित, मलेशियन एअरलाईन्सकडून 'या' खेळाडूची गैरसोय

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143