माजी भारतीय कर्णधार आणि आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्जचा संघनायक एमएस धोनी मोठ्या संकटात सापडला आहे. धोनी विरोधात बिहारच्या बेगूसरायमध्ये एफआयआर दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात धोनीशिवाय इतर 7 जणांना आरोपी ठरवण्यात आले आहे. हे प्रकरण फसवणुकीशी संबंधित असल्याचे समजत आहे.
धोनी (MS Dhoni) आणि इतर ७ लोकांवर एका खाद्य विक्रेत्याने ही एफआयआर दाखल (FIR Filed Against MS Dhoni) केली आहे. ३० लाख रुपयांचा चेक बाउंस झाल्याने ही केस दाखल करण्यात आली आहे.
खरे तर, हा २ कंपनींमधील विवाद आहे. एसके इंटरप्रायजेस बेगूसराय नावाच्या संस्थेने एका खाद्य कंपनीसोबत आपल्या उत्पादनाच्या विक्रीसाठी करार केला होता. या कंपनीद्वारे संस्थेला खाद्य तर पाठवले गेले, परंतु तिथून मार्केटिंगमध्ये सहकार्य केले गेले नाही. त्यामुळे आरोप हा आहे की, उत्पादनाची विक्री करण्यासाठी कंपनीने संस्थेनला सहकार्य केले नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादन शिल्लक राहिले आहे. यानंतर संस्थेचे मालक नीरज कुमार निराला यांनी कंपनीवर असहयोगाचा आरोप करत यामुळे संस्थेला मोठे नुकसान झाले असल्याचे म्हटले आहे.
चेक झालाय बाउंस
यानंतर कंपनीने शिल्लक राहिलेले उत्पादन परत घेतले होते आणि त्याच्या बदल्यात ३० लाखांचा चेक संस्थेला दिला होता. परंतु हा चेक बाउंस झाला. परिणामी संस्थेने अधिकृत नोटिस पाठवत कंपनीला याची सूचना दिली. या प्रकरणी कंपनीने कोणतेही समर्पक असे उत्तर दिलेले नाही. यानंतर कंपनीचे सीईओ राजेश आर्य यांच्यासहित इतर ७ पदाधिकाऱ्यांवर केस दाखल करण्यात आली आहे. धोनीने या उत्पादनाची जाहिरात केली होती, त्यामुळे तक्रारनाम्यात धोनीच्याही नावाचा समावेश आहे.
केसमध्ये धोनीच्याही नावाचा समावेश
धोनीने या उत्पादनाची जाहिरात केली होती. त्यामुळे नीरज निराला यांनी धोनीवरही गुन्हा दाखल केला आहे. कोर्टाने या प्रकरणाचा स्विकार केला असून २८ जून रोजी याप्रकरणी सुनावणी होईल. या केसमध्ये दिग्गज क्रिकेटपटूंपैकी एक असेलल्या धोनीच्या नावाचाही समावेश असल्याने ही केस चर्चेत आली आहे.
महास्पोर्ट्सचा वॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
तेलही गेलं अन् तूपही गेलं! अंतिम सामना गमावताच अश्विनच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद
भारताच्या प्रारंभीच्या काळातील चपळ विकेटकीपर, ऑस्ट्रेलिया दौरा गाजवत कमावले होते नाव