भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या बंगळुरूमधील रेस्टॉरंटवर पोलिसांनी कारवाई केली आहे. कर्नाटक पोलिसांनी बंगळुरू येथील वन8 कम्युन विरुद्ध एफआयआर दाखल केल्याचं वृत्त आहे. बंगळुरू पोलिसांनी आणखी अनेक उपाहारगृहांवर कडक बंदोबस्त ठेवला आहे. रात्री उशिरा वेळेच्या मर्यादेचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
बंगळुरूच्या एमजी रोडवर असलेल्या कोहलीच्या पबविरुद्ध पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. या प्रकरणी प्रतिक्रिया देताना डीसीपी सेंट्रल म्हणाले, “आम्ही रात्री उशिरा 1.30 वाजेपर्यंत सुरू असलेल्या पबवर कारवाई केली आहे. आम्हाला मोठ्या आवाजात संगीत वाजवलं जात असल्याची तक्रार मिळाली होती. पब फक्त रात्री 1 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी आहे, त्यापलीकडे नाही”.
बंगळुरू व्यतिरिक्त विराट कोहलीच्या मालकीचे पब दिल्ली, मुंबई, पुणे आणि कोलकाता येथेही आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बंगळुरूमधील हा पब गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच सुरू झाला होता. हा पब रत्नम कॉम्प्लेक्सच्या सहाव्या मजल्यावर आहे. एका मुलाखतीत विराटनं बंगळुरूला त्याचं आवडतं शहर म्हटलं होतं. हे शहर माझ्या ‘हृदयाच्या जवळ’ असल्याचं तो म्हणाला होता. त्यामुळे त्यानं येथे रेस्टॉरंट सुरू करण्याचा निर्णय घेतला.
विराट कोहली सध्या पत्नी अनुष्का शर्मासोबत लंडनमध्ये आहे. तेथे हे दोघे विराटच्या विश्वचषक विजयाचा आनंद साजरा करत आहे. मुंबईतील भारतीय संघाच्या विजय परेडनंतर कोहली लंडनला रवाना झाला. त्नी अनुष्का शर्मा गेल्या अनेक दिवसांपासून लंडनमध्ये आहे. विश्वचषक विजयानंतर विराट कोहलीसह रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह या भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंना आराम देण्यात आला आहे. हे खेळाडू श्रीलंकेविरुद्धच्या टी20 आणि एकदिवसीय मालिकेत खेळणार नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या –
विराट कोहली पत्नी अनुष्कासोबत लंडनमध्ये कीर्तनाला पोहचला? व्हायरल व्हिडिओची सत्यता जाणून घ्या
रोहित शर्माच्या अनुपस्थितीत श्रीलंकेविरुद्ध भारतीय संघाचं नेतृत्व कोण करणार? या 2 खेळाडूंची नावं चर्चेत
डेव्हिड वॉर्नरला निवृत्ती मागे घ्यायची आहे? सूचक इंस्टाग्राम पोस्ट व्हायरल