वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेला गुरुवारी (5 ऑक्टोबर) सुरुवात झाली. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर मागील विश्वचषकाचा विजेता इंग्लंड व उपविजेता न्यूझीलंड यांच्या दरम्यान हा सामना खेळला गेला. न्यूझीलंडने 9 गडी राखून 283 धावांचे आव्हान यशस्वीरित्या पार केले. यामध्ये डेवॉन कॉनवे व रचिन रवींद्र यांनी नाबाद शतके झळकावली. कॉनवे याने विश्वचषकातील पहिले शतक पूर्ण केल्यानंतर, भारतीय चाहत्यांची मात्र धाकधूक वाढली आहे.
कॉनवे याने या विश्वचषकातील पहिले शतक पूर्ण केले. त्याने अखेरपर्यंत नाबाद राहत 121 चेंडूवर 19 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने 152 धावा केल्या. त्याच्या या शतकामुळे पहिल्याच सामन्यानंतर न्यूझीलंडच्या विश्वचषक जिंकण्याच्या आशा वाढल्याचे एका आकडेवारीवरून दिसून येते. मागील चार विश्वचषकापासून स्पर्धेत पहिले शतक करणाऱ्या खेळाडूच्या संघानेच विश्वचषक जिंकल्याचे या आकडेवारीवरून दिसून येते.
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंग याने 2007 वनडे विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात स्कॉटलंडविरुद्ध 113 धावांची खेळी केली होती. त्यावर्षी ऑस्ट्रेलियाने विश्वचषक आपल्या नावे केला होता. त्यानंतर 2011 विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात भारताच्या वीरेंद्र सेहवागने बांगलादेशविरुद्ध 175 धावा ठोकलेल्या. त्यावेळी देखील भारताने विश्वचषक उंचावलेला. 2015 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाच्या एरॉन फिंच व 2019 विश्वचषकात इंग्लंडच्या जो रूट याने पहिले शतक केल्यानंतर त्यांच्या संघाने विश्वचषक आपल्या नावे केलेला. त्यामुळे आता न्यूझीलंड विश्वचषक जिंकणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.
या सामन्याचा विचार केल्यास, इंग्लंडने जो रूट याच्या अर्धशतकाच्या जोरावर 282 धावा केल्या होत्या. त्या धावांचा न्यूझीलंडने अत्यंत सफाईदारपणे पाठलाग करत स्पर्धेतील आपला पहिला विजय संपादन केला.
(First Century In ODI World Cup That Team Won World Cup Conway Hits Century)
महत्वाच्या बातम्या –
वर्ल्डकपचं पहिलं अर्धशतक रुटच्या नावावर, एकट्याने फोडून काढली न्यूझीलंडची गोलंदाजी
‘काय राव हे…?’, पत्रकाराच्या प्रश्नावर रोहितने दिली ‘अशी’ रिऍक्शन, पाकिस्तानी कर्णधार बाबरही झाला लोटपोट