---Advertisement---

४ विश्वचषक ऑस्ट्रेलियाला एकहाती जिंकून देणारी ही खेळाडू फायनलमधून बाहेर

---Advertisement---

मेलबर्न। आज(८ मार्च) भारतीय महिला संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात महिला टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना होत आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा ऑस्ट्रेलियाचा महिला टी२० विश्वचषकाचा सहावा अंतिम सामना आहे.

या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात अष्टपैलू क्रिकेटपटू एलिसा पेरीचा समावेश नाही. त्यामुळे टी२० विश्वचषकातील ऑस्ट्रेलियाचा हा पहिलाच अंतिम सामना आहे ज्यात एलिसा पेरी खेळणार नाही. याआधी ऑस्ट्रेलियाने खेळलेल्या महिला टी२० विश्वचषकाच्या सर्व ५ अंतिम सामन्यात पेरी ऑस्ट्रेलियाच्या अंतिम ११ खेळाडूंमध्ये होती.

पण २ मार्चला न्यूझीलंड महिला संघाविरुद्ध टी२० विश्वचषक २०२०मधील साखळी फेरीचा शेवटचा सामना खेळताना पेरीच्या उजव्या पायाच्या स्नायूंमध्ये ताण (हॅमस्ट्रिंगची दुखापत) आला. त्यामुळे तिला उर्वरित टी२० विश्वचषकातून बाहेर पडावे लागले.

याच दुखापतीमुळे पेरी ५ मार्चला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उपांत्य सामन्यातही खेळली नाही. त्यामुळे असे पहिल्यांदाच झाले की टी२० विश्वचषकातील सामन्यात पेरीचा ऑस्ट्रेलियाच्या अंतिम ११ खेळाडूंमध्ये समावेश नव्हता.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्याआधी ऑस्ट्रेलियाने २००९ पासून सुरु झालेल्या महिला टी२० विश्वचषकात एकूण ३६ सामने खेळले होते. या सर्व सामन्यात पेरी ऑस्ट्रेलिया संघाचा भाग होती.

तिने आत्तापर्यंत टी२० विश्वचषकात ३६ सामन्यात २८.२७ च्या सरासरीने ३११ धावा केल्या आहेत. तसेच १७.७८ च्या सरासरीने आणि ५.७७ च्या इकोनॉमी रेटने ३७ विकेट्स घेतल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---