कोलकाता। इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामात गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात क्वालिफायर एकचा सामना रंगला. मंगळवारी (२४ मे) ईडन गार्डन्सवर झालेल्या या सामन्यात गुजरात टायटन्सने ७ विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह गुजरातने अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. आता गुजरात २९ मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामना खेळताना दिसेल.
दरम्यान, आयपीएलचा अंतिम सामना आयोजित करणारे अहमदाबादचे नरेंद्र मोदी स्टेडियम हे भारतातील सातवे ठिकाण ठरले आहे. यापूर्वी नवी मुंबईचे डीवाय पाटील स्टेडियम, चेन्नईचे एमए चिदंबरम स्टेडियम, कोलकाताचे ईडन गार्डन्स स्टेडियम, बंगळुरूचे एम चिन्नास्वामी स्टेडियम, हैदराबादचे राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम आणि मुंबईचे वानखेडे स्टेडियम या ठिकाणी भारतात आयपीएलचे अंतिम सामने खेळवण्यात आले आहेत (First IPL Final at Indian venues).
विशेष गोष्ट अशी की, यावर्षी अहमदाबादला अंतिम सामना होणार आहे आणि अहमदाबाद फ्रँचायझीचा संघ असलेल्या गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) अंतिम सामन्यात धडक मारली आहे. त्यामुळे गुजरातला अंतिम सामना आपल्या घरच्या मैदानावर खेळता येणार आहे.
यापूर्वी केवळ चेन्नई सुपर किंग्सबाबत अशी घटना घडली आहे. २०११ साली चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर (MA Chidambaram Stadium) पहिल्यांदाच आयपीएलचा अंतिम सामना आयोजित करण्यात आला होता. त्यावेळीही चेन्नई फ्रँचायझीचा संघ चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) अंतिम सामन्यात धडक मारली होती.
याव्यतिरिक्त अन्य पाच ठिकाणांवर जेव्हा पहिल्यांदा आयपीएलचा अंतिम सामना (IPL Final) खेळवण्यात आला, तेव्हा त्या ठिकाणच्या फ्रँचायझीचा संघ अंतिम सामन्यात पोहचलेला नव्हता.
जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर अंतिम सामना
आयपीएल २०२२ ची (IPL 2022) विशेष गोष्ट अशी की या हंगामातील अंतिम सामना अहमदाबादला होणार असल्याने जवळपास १ लाखांहून अधिक प्रेक्षक स्टेडियममध्ये उपस्थित राहू शकतात. कारण नरेंद्र मोदी स्टेडियम (Narendra Modi Stadium) हे जगातील सर्वात मोठे स्टेडियम आहे. या स्टेडियमची आसन क्षमता १ लाख ३२ हजार इतकी आहे.
भारतातील स्टेडियमवरील पहिले अंतिम सामने –
डीवाय पाटील स्टेडियम – राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, २००८
एमए चिदंबरम स्टेडियम – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, २०११
ईडन गार्डन्स स्टेडियम – मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, २०१३
एम चिन्नास्वामी स्टेडियम – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स, २०१४
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम – मुंबई इंडियन्स विरुद्ध रायझिंग पुणे सुपर जायंट्सस २०१७
वानखेडे स्टेडियम – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, २०१८
नरेंद्र मोदी स्टेडियम – गुजरात टायटन्स विरुद्ध संघ निश्चित नाही, २०२२
महत्त्वाच्या बातम्या –
गुजरातच उचलणार आयपीएल ट्रॉफी? आकडेवारी देतायेत ग्वाही, तब्बल १० वेळा झालंय ‘असं’
असं काय घडलं? पंड्या, बटलर, मिलरबरोबरच केवळ ३ धावा करणाऱ्या जयस्वालचे झाले जोरदार कौतुक; पाहा Video
Qualifier 1 | डेविड मिलरची ‘किलर’ खेळी! माजी टीमला रडवलं अन् गुजरातला थेट फायनलमध्ये पोहोचवलं