पुणे : एक्सलंस चेस अकादमी यांच्या तर्फे आयोजित पहिल्या स्वर्गीय विनायक कुलकर्णी मेमोरियल रॅपिड खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत सुयोग वाघ, शिवम कयाळ, अर्जुन कौलगुड, नैतिक माने, धवल लोंढे, ईशान जंदु यांनी आपापल्या गटात अव्वल क्रमांक पटकावत विजेतेपद संपादन केले.
गुलमोहर हॉल, अभिरुची मॉल, सिंहगड रोड, पुणे येथे पार पडलेल्या या स्पर्धेत सातव्या फेरीत खुल्या गटात सुयोग वाघने अंजनेय फाटकचा पराभव करून ६.५गुणांसह पहिला क्रमांक पटकावला. अंजनेय फाटक याने दुसरा क्रमांक पटकावला. ७ वर्षाखालील गटात
शिवम कयाळने अनिश जवळकरचा पराभव करून ६ गुणांसह विजेतेपद पटकावले.
९ वर्षाखालील गटात अर्जुन कौलगुडने श्रीमठ पोलुरीला बरोबरीत रोखले व ६.५ गुणांसह विजेतेपदाचा मान पटकावला. ११ वर्षाखालील गटात नैतिक मानेने शर्विल आंबेडकरचा पराभव करून ६ गुणांसह विजेतेपद मिळविले. १३ वर्षाखालील गटात धवल लोंढेने कौशल खासनिसचा पराभव करून ७ गुणांसह विजेतेपद पटकावले. १५ वर्षाखालील गटात ईशान जंदुने
यथार्थ भूयानचा पराभव करून ६ गुणांसह विजेतेपदाला गवसणी घातली.
स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना करंडक व रोख रकमेची पारितोषिके देण्यात आली. याशिवाय युवा खेळाडू म्हणून एक्सलंस चेस अकादमीच्या निश्र्वंथ रामकुमार(५वर्षीय), अव्यान आंबेडकर(७वर्षाखालील), संदेश भोसले(९वर्षाखालील), शर्विल आंबेडकर(११ वर्षाखालील), धृव बांगेरा (१३ वर्षाखालील), मयुरेश चव्हाण(१४ वर्षाखालील), ऋषिकेश गोडसे(खुला गट) यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण दोन वेळा छत्रपती शिवाजी पुरस्कार विजेते व आंतरराष्ट्रीय मास्टर जयंत गोखले, गुलमोहर हॉलचे संचालक व व्हेन्यू पार्टनर यशोधन भिडे, श्रीमती.आशा कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालिका व इंटरनॅशनल आरबीटर फिडे इंस्ट्रक्टर जुईली कुलकर्णी, चीफ आरबीटर राजेंद्र शिदोरे, प्रशांत देशपांडे, अनिशा भागवत, केदार पळसुळे,
चेसलव्हर ग्रुपचे सदस्य सचिन खेर, सुयश पाटणकर, शोभराज उत्पत, अनिरुध्द मस्तुद, विशाल गावडे, केआयसी सीचे अम्रीश तल्लू आदी मान्यवर उपस्थित होते. चित्रा खरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
निकाल: सातवी फेरी: व्हाईट व ब्लॅक यानुसार: खुला गट:
अंजनेय फाटक(६गुण) पराभुत वि.सुयोग वाघ(६.५गुण);
प्रियांशु पाटील(५.५गुण)पराभुत वि.कशिश जैन(६गुण)
विहान दावडा(५.५गुण) बरोबरी वि.अमेय गोडबोले(५.५गुण);
आदित्य जोशी(६गुण)वि.वि.सिद्धांत ताम्हणकर(४.५गुण);
मिहीर सरवदे(५.५गुण)वि.वि.गौरव झगडे(४.५गुण);
सिद्धांत साळुंके(४.५गुण)पराभुत वि.कुशाग्र जैन(५.५गुण);
आर्यन सिंगला (५.५गुण)वि.वि.वैष्णव पौनीकर(४.५गुण);
अविरत चौहान (५.५गुण)वि.वि.अद्विक अग्रवाल(४.५गुण);
विकास शर्मा(४गुण)पराभुत वि.वेदांत गाडगे(५.५गुण);
विरेश शरणार्थी(५गुण)वि.वि.साई पाटील(४गुण);
७ वर्षाखालील गट:
शिवम कयाळ (६गुण)वि.वि.अनिश जवळकर(५.५गुण);
पार्थ शिंदे(६गुण) वि.वि.दर्शिल भिंचर (४गुण);
रिषभ पाटील(४गुण)पराभुत वि.ईशान मधवारी (५.५गुण);
वीर पाटील(४गुण)पराभुत वि.पर्व सांगळे(५गुण);
वीरेन मोहिते(३.५गुण)पराभुत वि.रियांश पितळे(५गुण);
९ वर्षाखालील गट:
अर्जुन कौलगुड (६.५गुण)बरोबरी वि.श्रीमठ पोलुरी (६गुण);
निवान अगरवाल(४.५गुण)पराभुत वि.वेदांत कुलकर्णी(६गुण);
शिवम दातीर(६गुण)वि.वि.तन्मय रावताळे(४गुण);
सनय गोखले(५गुण)वि.वि.क्रिश भोईर(४गुण);
आर्यन कुलकर्णी(४गुण)पराभुत वि.आर्श सावंत(५गुण);
११ वर्षाखालील गट:
केविन माथीयाझगन (५.५गुण)पराभुत वि.रीशित शहा(६गुण);
शर्विल आंबेडकर(५गुण)पराभुत वि.नैतिक माने(६गुण);
अनिरुध्द उदगिर(५गुण)पराभुत वि.संभव कांकरिया(५.५गुण);
कुशल झाडे(५गुण)बरोबरी वि.आर्घ्य देशमुख(५गुण);
अर्णव पुजारी(४गुण)पराभुत वि.पारस शर्मा(५गुण);
१३ वर्षाखालील गट:
धवल लोंढे(७गुण) वि.वि.कौशल खासनिस (४.५गुण);
वरुण पाटील(४.५गुण)पराभुत वि.ओजस देवगडे(६गुण);
विश्वक्सेना गुब्बा(५.५गुण)वि.वि.अथर्व येमूल(४.५गुण);
ऋषभ जोशी(५गुण)बरोबरी वि. आदित्य तेलंगी(५गुण);
अहान कार्तिक(४गुण)पराभुत वि.अमेय कुलकर्णी(५गुण);
१५ वर्षाखालील गट:
यथार्थ भूयान(५गुण)पराभुत वि.ईशान जंदु(६गुण);
तनिष्क शेवाळे(५गुण)बरोबरी वि.शुभम घनवट (५.५गुण);
अन्वय माळी (५गुण)पराभुत वि.शर्विल चौरीदुले(५.५गुण);
अर्णव तापकीर(४.५गुण)पराभुत वि.क्षिरील शहा(५.५गुण);
राकेश माथीयाझगन(५गुण)वि.वि.शुभम रिसवाडकर(४गुण).