भारताकडून आत्तापर्यंत मोहम्मद शमी, कुलदीप यादव (२ वेळा), कपिल देव आणि चेतन शर्मा या चार गोलंदाजांनाच वनडेत हॅट्रिक घेण्याची कामगिरी केली आहे. त्यातही चेतन शर्माच्या त्या खास हॅट्रिकचीही आठवण होणे ओघानेच आले. १९८६ मध्ये काही काळासाठी, चेतन शर्मा हा भारतातील सर्वात नावडत्या क्रिकेटपटू मधील एक होता, कारण १९८६ च्या ऑस्ट्रेलिया-आशिया कपच्या अंतिम सामन्यत त्याने टाकलेल्या शेवटच्या चेंडूवर जावेद मियाँदादने खणखणीत षटकार ठोकला होता आणि भारताने तो सामना हरला होता.
पण, त्यानंतर चेतन शर्मा ने दोन सनसनाट्या कामगिरीसह संघात पुनरागमन केले, त्यातील पहिली कामगिरी इंग्लंडमधील मालिकेत १६ बळी आणि दुसरी भारताच्या विश्वचषकच्या इतिहासातील सर्वात प्रतिष्ठित क्षणांपैकी एक आहे म्हणजेच विश्वचषकातील पहिली हॅट्रिक. आज (३१ ऑक्टोबर) त्या हॅट्रिकला ३५ वर्षे झाले आहेत.
सन १९८७ मध्ये भारताने चांगली कामगिरी करत विश्वचषकाची सुरुवात केली होती. जेव्हा भारतीय संघ साखळी फेरीतील अंतिम सामना खेळायला उतरला तेव्हा भारताची जागा उपांत्य सामन्यात निश्चित होती. सामना नागपूर येथे आयोजित करण्यात आला होता आणि न्यूझीलंडचा संघ प्रथम फलंदाजी करत होता.
🗓️ #OnThisDay in 1987!@chetans1987 created history after registering the first hat-trick in the World Cup. 🔝
He achieved this landmark feat against New Zealand in Nagpur. 👏#TeamIndia pic.twitter.com/TpxlPoul8d
— BCCI (@BCCI) October 31, 2022
दीपक पटेल यांच्या ४० आणि जॉन राइट यांच्या ३५ धावांच्या जोरावर न्यूझीलंड संघाची स्तिथी १८१-५ अशी होती. या टप्प्यावर चेतन शर्मा गोलंदाजीस आला. त्याने रदरफोर्ड, इयान स्मिथ आणि ईवान चॅटफिल्ड या तीन न्यूझीलंडच्या फलंदाजांना तीन चेंडूत बाद केले व तेही त्रिफळाचित.
असे करत तो जगातील तिसरा तर भारताचा पहिला गोलंदाज बनला ज्याने आंतरराष्ट्रीय सामन्यात हॅट्रिक घेतली होती. त्याच बरोबर विश्वचषकात हॅट्रिक घेणारा तो पहिला गोलंदाज बनला.
While we all have been swooning over the #Hattrick scored by @MdShami11 against #Afghanistan recently, I am reminded of Chetan Sharma, as he scored the first ever #WorldCup hat-trick in 1987 at #Nagpur against #NewZealand! @BCCI @ICC @cricketworldcup @chetans1987 @BLACKCAPS pic.twitter.com/PoqdjwDKse
— Dhanraj Nathwani (@DhanrajNathwani) June 24, 2019
न्यूझीलंडने २२१ धावा केल्या आणि भारताने सुनील गावसकरच्या ८८ चेंडूत १०३ आणि कृष्णा श्रीकांतच्या ५८ चेंडूत ७५ धावांच्या जोरावर सामना जिंकला. या सामन्याचा मानकरी शतकवीर सुनील गावस्कर आणि हॅट्रिक मॅन चेतन शर्मा हे दोघेही होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
…आणि 17 वर्षांपूर्वी केलेल्या ‘त्या’ खेळीने धोनी भारतीय चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला
दक्षिण आफ्रिकेच्या विजयानंतर अशी बनलीत उपांत्य फेरीची समीकरणे; भारत-पाकिस्तानला…