दिल्ली प्रीमियर लीग 2024 (DPL 2024) शनिवार, 17 ऑगस्टपासून सुरू होणार आहे आणि या स्पर्धेचे सर्व सामने दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर (Arun Jaitley Stadium) खेळले जाणार आहेत. या लीगच्या पहिल्या सामन्यात दिल्ली 6 संघाचा सामना दिल्ली सुपरस्टार्सशी होणार असून या सामन्यापूर्वी भव्य उद्घाटन सोहळ्याचं आयोजन देखील करण्यात आलं आहे.
दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनने (DDCA) दिल्ली प्रीमियर लीग 2024चे (DPL) वेळापत्रक जाहीर केले. दिल्ली टी20 फ्रँचायझी लीगचा पहिलाच हंगाम असणार आहे. त्यामध्ये भारतीय क्रिकेटमधील काही मोठी नावे असतील, तर 10 संघांपैकी 6 पुरुष संघ आणि 4 महिला संघ सहभागी होणार आहेत. स्टार यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) आणि अनुभवी गोलंदाज इशांत शर्मा (Ishant Sharma) या दोघांना जुनी दिल्ली 6 संघानं करारबद्ध केलं आहे.
दिल्ली प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामात जुनी दिल्ली 6, दक्षिण दिल्ली सुपरस्टार्स, पूर्व दिल्ली रायडर्स, मध्य दिल्ली किंग्स, उत्तर दिल्ली स्ट्रायकर्स, पश्चिम दिल्ली लायन्स, हे सहा पुरुष संघ सहभागी होणार आहेत, तर दक्षिण दिल्ली सुपरस्टार्स, मध्य दिल्ली क्वीन्स, उत्तर दिल्ली स्ट्रायकर्स, ईस्ट दिल्ली रायडर्स हे चार संघ सहभागी होणार आहेत.
सहा पुरुष संघांच्या या स्पर्धेत 33 सामने होणार आहेत. अंतिम सामना (8 सप्टेंबर) रोजी खेळला जाणार आहे. हा सामना अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाणार आहे, उद्घाटन सामना रात्री 8:30 वाजता सुरू होईल, तर उर्वरित सामने दुपारी 2:00 आणि 7:00 वाजता खेळवले जाणार आहेत. हे सर्व सामने क्रिकेट चाहत्यांना स्पोर्ट्स 18 या टीव्ही चॅनलवर पाहता येणार आहेत, तर जिओ सिनेमा ॲप्लिकेशन आणि वेबसाइटवर देखील मोफत सामने पाहता येणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
“असं वाटलं होतं ती मरेल” विनेश फोगटच्या प्रशिक्षकाचे खळबळजनक वक्तव्य!
द्रविडचा मुलगा समितचे महाराजा ट्रॉफीमध्ये पदार्पण, पहिल्या सामन्यात कशी राहिली कामगिरी?
कोहली-बाबर नाही, तर ‘हा’ खेळाडू टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा बादशाह!