fbpx
Thursday, April 22, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जे १३ वर्षात यष्टीरक्षक एमएस धोनीलाही नाही जमले ‘ते’ संजू सॅमसनने करुन दाखवले

first time in 760 IPL matches that a keeper took two stumpings off two consecutive balls.

September 23, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0

आयपीएलच्या तेराव्या हंगामातील चौथा सामना मंगळवारी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात झाला. या सामन्यात नाणेफेक जिंकत एमएस धोनीने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. परंतू राजस्थानच्या संजू सॅमसन, स्टिव स्मिथ व जोफ्रा आर्चरने हा निर्णय अयोग्य ठरवत चेन्नईची चांगलीच धुलाई केली.

राजस्थानने निर्धारित २० षटकांत ७ बाद २१६ धावा करताना चेन्नईच्या जवळपास सर्वच गोलंदाजांना रडकुंडीला आणले. संजू सॅमसनने ३२ चेंडूत ७४ धावा केल्या. यात त्याच्या एका चौकाराचा आणि ९ षटकारांचा समावेश होता. तर स्टिव स्मिथने ४७ चेंडूत ६९ आणि जोफ्रा आर्चरने ८ चेंडूत २७ धावा ठोकल्या.

त्यानंतर राजस्थानच्या २१७ धावांच्या डोंगराएवढ्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नई संघ ६ विकेट्स गमावत केवळ २०० धावा करु शकला आणि राजस्थानने १६ धावांनी सामना खिशात घातला. दरम्यान राजस्थानच्या सॅमसनने यष्टीमागेही दमदार कामगिरी करत एक अनोखा विक्रम आपला नावावर केला. first time in 760 IPL matches that a keeper took two stumpings off two consecutive balls.

झाले असे की, राजस्थानचा फिरकीपटू राहुल तेवतिया डावातील ९वे षटक टाकण्यासाठी आला. त्याच्या दूसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर चेन्नईचा फलंदाज सॅम करनने एकापाठोपाठ एक २ दमदार षटकार मारले. पण राहुलने षटकातील पाचवा चेंडू टाकला, जो थोडा बाहेरच्या बाजूने गेला आणि यष्टीमागे असणाऱ्या सॅमसनने तो चेंडू पकडत करनला यष्टीचीत केले. एवढेच नाही तर, पुढील चेंडूवरही नुकताच फलंदाजीला आलेल्या ऋतुराज गायकवाडलाही त्याने यष्टीचीत करत तंबूचा रस्ता दाखवला.

यासह सॅमसन हा आयपीएलमधील आतापर्यंतच्या ७६० सामन्यांच्या इतिहासात सलग २ चेंडूंवर २ फलंदाजांना यष्टीचीत करणारा पहिलाच यष्टीरक्षक ठरला आहे. त्याच्याव्यरिक्त आजवर कोणत्याही यष्टीरक्षकाला हा कारनामा करता आला नाही.


Previous Post

राजस्थानविरुद्ध ‘कॅप्टन कुल’ धोनीचं नक्की चुकलं तरी काय?

Next Post

ये आयपीएल है भाई! पाहा यंदा आयपीएलमध्ये खेळणाऱ्या ३ भावा भावांच्या जोड्या

Related Posts

Photo Courtesy: Twitter/ICC
टॉप बातम्या

शारजातील सचिनच्या ‘त्या’ वादळी खेळीवेळीची आयसीसी वनडे क्रमवारी

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/ICC
टॉप बातम्या

सचिन जेव्हा शारजात शानदार खेळला तेव्हा त्याचा सीव्ही कसा होता?

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

आठ वर्षात जमले नाही ते धोनीने आयपीएलच्या यंदाच्या हंगामात केले, पाहा चक्रावून टाकणार रेकॉर्ड

April 22, 2021
Photo Courtesy: Facebook/IPL
IPL

मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी! कोरोनातून सावरल्याने ‘हा’ सदस्य करणार पुनरागमन

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/@sportzhustle
IPL

आयपीएल २०२१ चा भावूक क्षण! रैनाने धरले भज्जीचे पाय, पाहा व्हिडिओ

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/@IPL
IPL

व्हिडिओ : वाईड म्हणून सोडला चेंडू आणि पायामागून झाला बोल्ड, रसेल झाला अजब पद्धतीने बाद

April 22, 2021
Next Post

ये आयपीएल है भाई! पाहा यंदा आयपीएलमध्ये खेळणाऱ्या ३ भावा भावांच्या जोड्या

आयपीएलच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं! एकाच सामन्यात पडला 'एवढ्या' षटकारांचा पाऊस

दुर्दैव! फाफ डु प्लेसिस सारखी वेळ कोणावरही येऊ नये

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.