---Advertisement---

रॉयल्सने ‌‌‌‌‌‌‌करून दाखवलं! सवाई मानसिंग स्टेडियमवर 16 वर्षात प्रथमच बनल्या 200 धावा

---Advertisement---

आयपीएल 2023 मध्ये गुरुवारी (27 एप्रिल) राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना खेळला गेला. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. फलंदाजांनी हा निर्णय योग्य ठरवत 5 बाद 202 अशी मजल मारली. त्याचबरोबर आयपीएल इतिहासात प्रथमच सवाई मानसिंग स्टेडियमवर 200 चा आकडा पार केला गेला.

https://twitter.com/IPL/status/1651614084083888130?t=M7O56IX9NAromVhuRt6SsA&s=19

 

हंगामाच्या सुरुवातीपासून चांगल्या लयीमध्ये असलेल्या राजस्थानची लय मागील दोन सामन्यात बिघडली. त्यांना सलग दोन सामन्यात पराभूत व्हावे लागले. धावांचा पाठलाग करताना पराभूत व्हावे लागल्याने यावेळी प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर जोस बटलर व यशस्वी जयस्वाल यांनी पहिल्या गड्यासाठी 8.2 षटकात 86 धावांची सलामी दिली. बटलर 27 धावा करून बाद झाल्यानंतर जयस्वालने 77 धावांची सर्वोत्तम खेळी केली. त्यानंतर ध्रुव जुरेलने 34 व देवदत्त पडिक्कलने नाबाद 27 धावा करत राजस्थानला 202 पर्यंत मजल मारून दिली.

यासोबतच सवाई मानसिंग स्टेडियमवर प्रथमच 200 धावांचा टप्पा पार केला गेला. 2008 पासून या मैदानावर आयपीएलचे सामने होत आहेत. मात्र, कोणत्याही संघाला अशी कामगिरी करता आली नव्हती. यापूर्वी 2008 मध्ये राजस्थानने आरसीबीविरुद्ध 1 बाद 197 धावा उभ्या केल्या होत्या. त्यानंतर पुन्हा राजस्थानने डेक्कन चार्जर्सविरुद्ध 197 धावा केलेल्या. राजस्थानने 2008 मध्ये केकेआरविरूद्ध 196 तर चेन्नईने राजस्थानविरूद्ध 2012 मध्ये हीच धावसंख्या उभारली होती.

राजस्थान रॉयल्सने ही धावसंख्या उभी केल्याने, त्यांच्यासमोर आणखी एक लक्ष असेल. आयपीएलमध्ये राजस्थानने आतापर्यंत 10 वेळा 200 पेक्षा जास्त धावांचा बचाव केला आहे. हाच इतिहास कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करताना दिसतील.

(First Time In IPL History Any Team Post 200 Runs At Sawai Mansingh Stadium Jaipur Rajasthan Royals Did This)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 
महत्वाच्या बातम्या-
एलिमीनेटर 1 – टाय ब्रेकर नंतर पालघर काझीरंगा रहिनोसने अतिरिक्त वेळेत मारली बाजी, पुण्याचे आव्हान संपुष्टात 
WTC Final आधी टीम इंडियाचे वाढले टेन्शन! आयसीसीच्या ‘त्या’ निर्णयाने ऑस्ट्रेलिया खुश

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---