---Advertisement---

तब्बल 92 वर्षानंतर क्रिकेटच्या मैदानावर घडली ‘ती’ गोष्ट! 120 वर्षापूर्वी आफ्रिकेने केलेली सुरुवात

On: मंगळवार, ऑक्टोबर 11, 2022 4:04 PM
INDvSA
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघ घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिका खेळत आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघांनी एक-एक सामना जिंकल्याने मालिका बरोबरीत आली आहे. त्यामुळे मंगळवारी (11 ऑक्टोबर) दिल्ली येथे खेळल्या जाणाऱ्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात मालिका विजेता ठरणार आहे. हा सामना अरूण जेटली स्टेडियमवर खेळला जातोय. अनुभवी फलंदाज डेव्हिड मिलरने दक्षिण आफ्रिकेचा वनडे कर्णधार म्हणून पदार्पण केले आहे. मिलर संघाचा कर्णधार बनताच दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाच्या नावे एक अजब विक्रम जमा झाला आहे.

मालिका जिंकण्याच्या उद्देशाने मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेसाठी डेव्हिड मिलर नाणेफेकीसाठी आला. मालिकेतील पहिल्या सामन्यात नियमित कर्णधार टेंबा बवुमाने संघाचे नेतृत्व केलेले. तर, दुसऱ्या सामन्यात अष्टपैलू केशव महाराज याच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिका संघ मैदानात उतरलेला. वनडे क्रिकेटच्या 51 वर्षांच्या इतिहासात प्रथमच एकाच मालिकेतील सर्व सामन्यांमध्ये वेगवेगळे कर्णधार खेळवले गेले.

कसोटी क्रिकेटमध्ये मात्र अशी घटना दोन वेळा घडली आहे. 1902 मध्ये दक्षिण आफ्रिकेनेच ऑस्ट्रेलिया विरुद्ध तीन सामन्यात तीन कर्णधार वापरलेले. तर 1930 मध्ये वेस्ट इंडीजने इंग्लंडविरुद्ध चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत चार वेगवेगळ्या कर्णधारांच्या नेतृत्वात चार सामन्यांची मालिका खेळली होती. त्यामुळे तब्बल 92 वर्षानंतर अशा प्रकारे एकाच मालिकेत सर्व नवीन कर्णधार पाहण्याचा योग क्रिकेटप्रेमींना लाभला.

सध्या सुरू असलेल्या मालिकेतील लखनऊ येथे झालेला पहिला सामना दक्षिण आफ्रिकेने नऊ धावांनी आपल्या नावे केला होता. त्यानंतर रांची येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने पुनरागमन केले. भारताने सात गडी राखून विजय मिळवत मालिका बरोबरीत आणली होती.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
INDvSA: मालिका निर्णायक सामन्यात नाण्याचा कौल भारताच्या बाजूने, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग इलेवन
‘ही’ गोष्ट विजय किंवा पराभवाने ठरत नाही, रविचंद्रन अश्विनचे पीसीबी अध्यक्षांना सडेतोड प्रत्युत्तर 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---