इंग्लंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर असून या दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. यातील पहिला सामना रावळपिंडी येथे 1 डिसेंबरपासून खेळली जात आहे. यावेळी इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करताना धावांचा डोंगर रचला. त्यांनी पहिल्या डावाच्या 101 षटकात सर्वबाद 657 धावसंख्या उभारली. या सामन्याच्या प्रत्येक दिवशी विक्रमे रचली गेली, जी कसोटीच्या इतिहासात कोणत्याच संघांच्या खेळाडूंनी केली नव्हती.
या सामन्यात दोन्ही संघातील अनेक खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी केली करत विक्रमांची रांग लावली आहे. सर्वप्रथम तर इंग्लंडचे सलामीवीर झॅक क्राऊले (Zak Crawley) आणि बेन डकेट (Ben Duckett) यांनी शतकी खेळी केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी विक्रमी 233 धावांची भागीदारी केली. यावेळी क्राऊलेने 122 आणि डकेटने 107 धावा केल्या. पाकिस्तानच्याही सलामीवीरांनी उत्तम सुरूवात केली. अब्दुल्लाह शफिक (Abdullah Shafique) याने 114 आणि इमाम उल हक (Imam Ul Haq) याने 121 धावा केल्या.
कसोटीच्या इतिहासात प्रथमच दोन्ही संघांच्या सलामीवीरांनी एकाच सामन्याच्या पहिल्या डावांमध्ये शतकी खेळी करण्याचा पराक्रम केला आहे.
या सामन्याच्या पहिल्या डावात इंग्लंडच्या आणखी दोन फलंदाजांनी शतक ठोकले. ओली पोप याने 108 आणि हॅरी ब्रूक याने 153 धावा केल्या. ही चारही शतके पहिल्या दिवसात झाली. त्यामुळे हा पण एक विक्रमच ठरला. त्याचबरोबर ब्रूकने एका षटकात 6 चौकार मारण्याचा विक्रम करताना इंग्लंडकडून एका षटकात सर्वाधिक कसोटी धावा (27) करण्याचाही पराक्रम केला.
➡️ First time in Test history that openers of both teams have scored 💯s in their first innings of the same match 🏏#PAKvENG | #UKSePK pic.twitter.com/ha4Dumm8eA
— Pakistan Cricket (@TheRealPCB) December 3, 2022
याच सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडने 500 धावसंख्येचा आकडा पार केला होता. यामुळे कसोटीच्या पहिल्या दिवशी 500 पेक्षा सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही त्यांनी केला.
सध्या पाकिस्तानचा पहिला डाव सुरू असून संघाने 3 विकेट्स गमावात 298 धावा केल्या आहेत. अझर अली 27 धावा करत बाद झाला. खेळपट्टीवर कर्णधार बाबर आझम (28) आणि सौद शकील उपस्थित आहेत. First time in Test history openers of both teams have scored century in first innings of the same match
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वाढदिवस विशेष। मितालीची ऐतिहासिक कामगिरी, बनली सचिननंतर ‘असा’ कारनामा करणारी पहिलीच क्रिकेटपटू
पुन्हा होणार बांगलादेशची ‘हवा टाईट’, सर्वाधिक धावा करणारा ‘हा’ फलंदाज उतरणार मैदानात