---Advertisement---

बापरे! तब्बल ३४ सामन्यानंतर भारताचा एशिया कपमध्ये पराभव

---Advertisement---

भारतीय महिला संघ आज एशिया कपमध्ये प्रथमच पराभूत झाला. त्यांना बांग्लादेशने ७ विकेट्सने पराभूत केले आहे.

याबरोबर भारतीय संघ प्रथमच या स्पर्धेत पराभूत झाला आहे. २०१२मध्ये सुरु झालेल्या या स्पर्धेत भारतीय संघ एकुण ३५ सामने खेळला असुन त्यात केवळ आज हा संघ पराभूत झाला आहे.

शिवाय बांग्लादेशबरोबर टी२०मध्ये आजपर्यंत भारतीय पुरुष किंवा महीलांचा संघ बांग्लादेशविरुद्ध पराभूत झाला नव्हता. बांग्लादेश सलग १० टी२० सामन्यात पराभूत झाला होता त्याचा वचपा आज बांग्लादेशने काढला.

भारतीय महिला संघाविरुद्ध बांग्लादेशला वनडे आणि टी२०मध्ये कधीही विजय मिळवता आला नव्हता.

आजच्या सामन्यात भारताने नाणेफक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. २० षटकांत संघाने ७ बाद १४१ धावा केल्या. भारताकडून हरमनप्रीत कौरने ४२ तर दीप्ती शर्माने ३२ धावा केल्या.

१४२ धावांच लक्ष घेऊन मैदानात आलेल्या बांग्लादेशने हे लक्ष १९.४ षटकांत पार केले. फर्गाना हकने नाबाद ५२ तर रुमाना अहमदने बांग्लादेशकडून ४२ धावा केल्या. रुमानानेच या सामन्यात ३ विकेट्सही घेतल्या आहेत.

शनिवारपासून खास क्रिकेट चाहत्यांसाठी- मुंबई क्रिकेट – सफरनामा
भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील जवळपास एक-तृतीयांश धावा ह्या मुंबईच्या फलंदाजांनी केलेल्या आहेत. आजपर्यंतच्या खेळल्या गेलेल्या ८४ रणजी ट्रॉफीजपैकी ४१ मुंबई क्रिकेटच्या ताब्यात आहेत. एखाद्या स्पर्धेत इतके प्रचंड प्रभुत्व गाजवल्याचे दुसरं उदाहरण क्रीडाविश्वात सापडणं अवघड. या विजयांमागे जवळपास १४० वर्षांचा इतिहास उभा आहे ज्याबद्दल जास्त माहिती चाहत्यांना मिळावी म्हणुन आम्ही एक विशेष प्रयत्न करत आहोत. म्हणून अशा या दैदिप्यमान परंपरेचा आढावा घेणारी ही खास लेखमालिका शनिवार ९ जूनपासुन आपल्यासाठी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment