न्यूझीलंडचा संघ स्कॉटलँड दौऱ्यावर गेला असून उभय संघात ३ सामन्यांची टी२० मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना बुधवारी (२७ जुलै) खेळला गेला. या सामन्यात पाहुण्या न्यूझीलंडने ६८ धावांच्या अंतराने विजय मिळवला. न्यूझीलंडच्या विजयाचा सर्वात मोठा शिल्पकार राहिला फिन ऍलन. त्याने स्कॉटलँडविरुद्ध शानदार शतकी खेळी केली. यासह त्याने काही विक्रमही आपल्या नावावर केले आहेत.
२३ वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज फिन ऍलन (Finn Allen) याने स्कॉटलँडविरुद्ध पहिल्या टी२० सामन्यात सलामीला फलंदाजीला येत शतक ठोकले आहे. ५४ चेंडूंचा सामना करताना चौफेर फटकेबाजी करत त्याने शतकी खेळी केली आहे. शतकी खेळीनंतर त्याने आपली विकेट गमावली. ५६ चेंडूंमध्ये ६ षटकार आणि ८ चौकारांच्या मदतीने १०१ धावा करत तो बाद झाला. हे त्याच्या टी२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिलेवहिले शतक ठरले आहे.
टी२० क्रिकेटमध्ये घडला इतिहास
ऍलनव्यतिरिक्त फ्राँसकडून गत्सव मकीन (Gustav McKeon) आणि स्वित्झर्लंडकडून फहीम नाझीर (Faheem Nazir) यांनीही आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात शतके केली आहे. विशेष म्हणजे, त्यांनीही बुधवारीच ही शतके केली आहेत. यासह टी२० क्रिकेटच्या इतिहासात एकाच दिवशी ३ फलंदाजांनी शतके झळकावण्याची विश्वविक्रमी कामगिरी घडली आहे.
फ्राँसचा प्रतिभाशाली सलामीवीर गस्तव मकीनने नॉर्वेविरुद्धच्या आयसीसी टी२० विश्वचषक यूरोप क्वालिफायरमधील सामन्यात १०१ धावांची प्रशंसनीय खेळी केली आहे. हे या स्पर्धेतील आणि आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधील त्याने सलग दुसरे शतक आहे. यापूर्वी स्वित्झर्लंडविरुद्धच्या सामन्यातही त्याच्या बॅटमधून शतक निघाले होते.
तसेच आयसीसी टी२० विश्वचषक यूरोप क्वालिफायरमध्येच स्वित्झर्लंडकडून फहिम नाझीरनेही शतकी खेळी केली आहे. इस्टोनियाविरुद्धच्या सामन्यात सलामीला फलंदाजीला येत त्याने ६८ चेंडूत नाबाद १०७ धावा फटकावल्या आहेत.
आज पहिल्यांदाच एकाच दिवशी ३ किंवा अधिक आंतरराष्ट्रीय टी२० शतके नोंदवली गेली
फिन ऍलन (१०१) न्यूझीलंड
फहीम नझीर (१०७*) स्वित्झर्लंड
गुस्तव मकीन (१०१) फ्रान्स
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
शुबमन गिलने वेस्ट इंडिज गोलंदाजाच्या चेंडूवर ठोकला असा षटकार की बदलावा लागला चेंडू
मैदान तुम्हारा धमाका हमारा! बार्बाडोसमध्ये १० वर्षांपासून फक्त भारतीय सलामीवीरांचीच हवा
‘तो काही चमत्कार करू शकणार नाही’, द्रविडने आणलेल्या खास माणसाबद्दल श्रीसंतचे लक्षवेधी भाष्य