पुणे। सनगार्ड, आयरिसर्च, डिसॉल्ट, परसिस्टंट या संघांनी प्रथम व्हिन्टेज कप आयटी टी-२० क्रिकेट स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली.
मुकुंदनगर येथील कटारिया हायस्कूलच्या मैदानावर व पिंपरी-चिंचवड येथील व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. येथे झालेल्या लढतीत सनगार्ड संघाने मिंडट्री संघावर ९ गडी राखून सहज मात केली. मिंडट्री संघाला ८ बाद ८० धावाच करता आल्या. सनगार्ड संघाने विजयी लक्ष्य १ गडीच्या मोबदल्यात ५.३ षटकांतच पूर्ण केले.
यात पार्थ शर्माने २८ चेंडूंत १२ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ८० धावा केल्या. यानंतर आयरिसर्च संघाने अटॉससिन्टेल संघावर २३ धावांनी मात केली. आयरिसर्च संघाने प्रथम फलंदाजी करताना ३ बाद १९१ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना अटॉससिन्टेल संघाला ६ बाद १६८ धावाच करता आल्या. डिसॉल्ट संघाने कॉग्निझंट संघावर ४ गडी राखून मात केली. यानंतर परसिस्टंट संघाने एफआयएस ग्लोबल संघावर ४२ धावांनी विजय मिळवला.
संक्षिप्त धावफलक –
१) मिंडट्री – २० षटकांत ८ बाद ८० (उदय गलांडे २१, हर्षल मानकर १३, रोहित शेट्टी २-१६, पवन आनंद २-६) पराभूत वि. सनगार्ड – ५.३ षटकांत १ बाद ८५ (पार्थ शर्मा नाबाद ८०, हर्षल मानकर १-२६).
२) आयरिसर्च – २० षटकांत ३ बाद १९१ (गौरव बाबर नाबाद ९७, अक्षय खोडे ५०, संजय खेर ३२, साबिर शेख २-३६) वि. वि. अटॉससिन्टेल – २० षटकांत ६ बाद १६८ (साबिर शेख ५९, अभिजित पारिदा २८, हृषीकेश सालुंके २-३६, अशोक अय्यर २-२८).
३) कॉग्निझंट – २० षटकांत ९ बाद १६५ (प्रथमेश देशपांडे ६८, वैभव राजूरकर ४३, नितेश सप्रे २०, मुदित जैन ३-२२, संदीप चौहान २-२७, राजेश पाटील २-१०) पराभूत वि. डिसॉल्ट सिस्टिम – १९.५ षटकांत ६ बाद १६७ (श्रीधर खासनिस ७८, संग्राम पाटील नाबाद ४७, पुनीत करण ३-२२, गौरव कुलकर्णी २-३८).
४) परसिस्टंट – २० षटकांत ६ बाद १७३ (सुधीर परांजपे ४३, सिद्धार्थ गोखले ४२, विशाल पवार ३८, अमित चौहान ३-१८, प्रवीण सोनी २-२७) वि. वि. एफआयएस ग्लोबल – २० षटकांत ८ बाद १३१ (रोहित भटालिया ३९, गिरिश खडसे २४, प्रवीण सोनी नाबाद २०, विशाल पवार ३-११, सुधीर परांजपे १-९).





