भारतीय संघाने रविवारी (दि. 19 फेब्रुवारी) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात 6 गडी राखून मोठा विजय मिळवला. हा विजय मिळवताच भारतीय संघ चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 ने आघाडीवर पोहोचला. तसेच, बॉर्डर-गावसकर ट्रॉफी देखील भारताने आपल्याकडेच राखली. ऑस्ट्रेलियन संघ या पराभवातून सावरत असतानाच आता, त्यांच्यासाठी आणखी एक चिंताजनक बातमी समोर येतेय.
नागपूर येथील पहिल्या कसोटीत लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलिया पुनरागमन करेल अशी अपेक्षा होती. पहिल्या दोन दिवसात ऑस्ट्रेलियाने उत्कृष्ट खेळ दाखवत सामन्यावर पकड देखील मिळवली होती. मात्र, तिसऱ्या दिवशी पहिल्याच सत्रात ऑस्ट्रेलियाने आपले नऊ बळी गमावले. त्यानंतर भारतासमोर असलेले छोटे लक्ष भारताने चार गडी गमावत पूर्ण करत मालिकेत आघाडी घेतली.
ऑस्ट्रेलियन संघ या मालिकेत माघारला असतानाच आता ऑस्ट्रेलियाच्या तब्बल पाच खेळाडूंनी मायदेशाची वाट धरल्याचे सांगितले जात आहे. ऑस्ट्रेलियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड हा एकही सामना न खेळता दुखापतग्रस्त होऊन ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे. दिल्ली कसोटीत दुखापत झालेल्या डेव्हिड वॉर्नरनेही दुखापतीमुळे दौऱ्यातून माघार घेतल्याचे समजते. दिल्ली कसोटीत वॉर्नरचा कन्कशन सबस्टीट्यूट आलेला मॅट रेनशॉ हा देखील पाठीच्या दुखण्यामुळे उर्वरित मालिकेसाठी उपलब्ध नसेल. तसेच, फिरकीपटू ऍश्टन एगर याने देखील मायदेशाची वाट झाली आहे. संघाचा कर्णधार पॅट कमिन्स हा कौटुंबिक कारणाने मायदेशी गेला असून, तिसऱ्या कसोटीपूर्वी तो संघात दाखल होऊ शकतो.
एकाच वेळी पाच खेळाडू माझ्या देशात गेल्याने ऑस्ट्रेलियाच्या चिंतेत भर पडली आहे. मात्र, वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क व अष्टपैलू कॅमेरून ग्रीन हे पूर्णपणे तंदुरुस्त होत तिसऱ्या कसोटीत सहभागी होतील.
(Five Australia Cricketers Left India After Delhi Test Loss)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताकडे सेमीफायनलमध्ये जागा बनवण्याची शेवटची संधी, जाणून घ्या कशी असू शकते प्लेइंग इलेव्हन
लागोपाठ दोन पराभवाने ऑस्ट्रेलिया संघात भूकंप, कर्णधार मायदेशी परतला, आता पुढे काय? वाचा सविस्तर