२० ऑगस्टपासून भारताची ५ सामन्यांची एकदिवसीय मालिका श्रीलंका संघाबरोबर सुरु होत आहे. उद्या अर्थात १३ ऑगस्ट रोजी भारतीय संघाची या दौऱ्यासाठी घोषणा होणार असून देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएल यात प्रभावी कामगिरी करणाऱ्या काही खेळाडूंना या दौऱ्यात संधी मिळू शकते.
१. रिषभ पंत
२० वर्षीय यष्टीरक्षक रिषभ पंत हा भारताचा अतिशय प्रतिभाशाली खेळवू गणला जातो. रिषभने पहिला आंतरराष्ट्रीय सामना फेब्रुवारी महिन्यात इंग्लंड विरुद्ध खेळला होता. तो आजपर्यंत २ टी२० सामने भारताकडून खेळला असून त्यात त्याने ४३ धावा केल्या आहेत. सध्या सुरु असलेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात रिषभला चमकदार कामगिरी करता आलेली नसली तरी या खेळाडूला संघात संधी मिळू शकते.
२. अक्सर पटेल
रवींद्र जडेजावर एक सामन्याची बंदी आल्यामुळे अक्सर पटेलला ताबडतोब दक्षिण आफ्रिकेवरून श्रीलंकेत बोलावण्यात आले. परंतु या खेळाडूला कसोटी पदार्पणाची संधी काही मिळाली नाही. या दौऱ्यात अक्सरने चांगली कामगिरी केली असून ४ सामन्यात ७ बळी घेतले आहेत. जर रवींद्र जडेजा आणि आर अश्विन यांना या दौऱ्यात विश्रांती देण्यात आली तर अक्सरला भारताकडून खेळण्याची पुन्हा संधी मिळेल. यापूर्वी हा खेळाडू भारताकडून ३० एकदिवसीय सामने आणि ७ टी२० खेळला आहे.
३. कृणाल पंड्या
गेले दोन वर्ष जबदस्त कामगिरी करणाऱ्या कृणाल पंड्याला या दौऱ्यात संधी मिळू शकते. कृणालने गोलंदाजी आणि फलंदाजी या दोंन्ही विभागात आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. सध्या हा खेळाडूही दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून चांगली कामगिरी करत आहे. २६ वर्षीय कृणालने आजपर्यत १७ लिस्ट अ आणि ४० ट्वेंटी ट्वेंटी सामने खेळले आहेत.
४. युझवेन्द्र चहल
मुंबई इंडियन्स आणि बेंगलोरकडून चांगली कामगीरी करणारा युझवेन्द्र चहल सध्या दक्षिण आफ्रिकेत इंडिया अ कडून खेळत होते. त्याने ४ सामन्यात ६ बळी मिळवले आहेत.
५. मनीष पांडे
जबदस्त प्रतिभा असलेला हा खेळाडू देशांतर्गत क्रिकेटमध्ये अतिशय चांगली कामगिरी करून राष्ट्रीय संघात येतो. परंतु दुर्दैवाने दुखापत किंवा अन्य कारणामुळे पुन्हा बाहेर फेकला जातो. सध्या दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या मालिकेत त्याने इंडिया अ कडून तुफान कामगिरी करताना ५ सामन्यांत ३०७ च्या सरासरीने ३०७ धावा केल्या आहेत. पाच पैकी ४ सामन्यात तो नाबाद राहिला आहे.