ऑस्ट्रेलियामध्ये 16 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. 15 सदस्यीय भारतीय संघाचे नेतृत्त्व मुंबईकर रोहित शर्मा करणार असून, उपकर्णधार म्हणून केएल राहुलची निवड करण्यात आली आहे. (team India for t20 world cup) आशिया कपमध्ये झालेल्या दारुण पराभवामुळे संघात काही बदल करण्यात आले आहेत. या संघात मागील वर्षी विराट कोहलीच्या नेतृत्वात विश्वचषक खेळलेल्या 5 खेळाडूंना जागा मिळाली नाही.
मागील वर्षाच्या टी20 विश्वचषकात विराट कोहलीने संघाचे नेतृत्व केले होते. संघ निवडीत कर्णधाराची भूमिका अनेकदा महत्त्वाची असते. यावेळी रोहित शर्माने देखील काही आपल्या पसंतीच्या खेळाडूंना संधी दिली.
भारतीय संघाच्या निवडीत ज्या नावाची सर्वाधिक चर्चा झाली ते नाव म्हणजे वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याचे. आशिया चषकातील भारतीय संघाच्या खराब कामगिरीनंतर त्याला संघात घेण्याची मागणी होत होती. त्याचा राखीव खेळाडूंमध्ये समावेश केला गेला आहे. मात्र, प्रमुख संघात त्याला आपली जागा बनवता आली नाही.
मागील वर्षीच्या विश्वचषक संघात अनपेक्षितपणे युवा यष्टीरक्षक ईशान किशन याला संधी मिळाली होती. त्या विश्वचषकात तो फारशी चांगली कामगिरी करू शकला नाही. त्यानंतरही त्याला सातत्याने संधी दिली गेली. यात तो काहीवेळा यशस्वी ठरला. मात्र, मागील महिन्यात झालेल्या वेस्ट इंडिज व झिम्बाब्वे दौऱ्यावर त्याला अपयश आले होते.
ईशान प्रमाणेच मागील वर्षी युवा लेगस्पिनर राहुल चहर याला संघात स्थान दिले गेले होते. अनुभवी युझवेंद्र चहलला डावलून त्याला संधी मिळालेली. मात्र, विश्वचषक आणि त्यानंतरही तो निवड समितीला खुश करण्यात अपयशी ठरला. राहुलप्रमाणेच आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करून मिस्ट्री स्पिनर वरूण चक्रवर्ती याला भारतीय संघात जागा मिळालेली. मात्र, त्या विश्वचषकात त्याला एकही बळी मिळवताना न आल्याने निवडसमितीचे हे सरप्राईज पॅकेज पूर्णपणे फेल गेले होते. त्यानंतर त्याला भारतीय संघात फारशी संधीच मिळाली नाही.
मुंबईकर अष्टपैलू शार्दुल ठाकूर यालादेखील यावेळी संघात जागा मिळाली नाही. अगदी काही महिन्यापर्यंत तो भारतीय संघाचा सदस्य होता. मात्र, दुखापत झाल्याने तो संघाबाहेर गेला. त्यानंतर हार्दिक पंड्याने धमाकेदार पुनरागमन करत संघात जागा बनवल्याने शार्दुलला यावेळी विश्वचषक संघात सामील केले गेले नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
क्या बात! सलग आठ टी20 विश्वचषकात टीम इंडियात निवड झालेला ‘तो’ एकमेव खेळाडू
अरे, याला नाही घेणार टीममध्ये! आता ‘तोच’ झालायं भारताच्या टी20 विश्वचषक संघात इन
मोठी बातमी: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, ‘हा’ खेळाडू करणार नेतृत्त्व






