---Advertisement---

टी२० क्रिकेटमध्ये १० हजार धावा पूर्ण करणारे ५ फलंदाज, भारताच्या ‘रनमशीन’चाही समावेश

On: शुक्रवार, ऑक्टोबर 1, 2021 8:44 PM
---Advertisement---

भारतीय कर्णधार विराट कोहली सध्या जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जवळपास सर्व संघांविरोधात उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. तो सध्या आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे नेतृत्व करत आहे. आयपीएलमध्ये २६ सप्टेंबरला खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने आप्रतिम अर्धशतकी खेळी केली आणि टी२० क्रिकेटमधील त्याच्या १०,००० धावा पूर्ण केल्या.

विराट जागतिक क्रिकेटमध्ये पाचवा खेळाडू ठरला आहे, ज्याने टी२० मध्ये १०,००० धावांचा टप्पा पार केला आहे. आपण या लेखात याच पाच खेळाडूंची माहीती घेणार आहोत.

पाच खेळाडू ज्यांनी टी२० क्रिकेटमध्ये १०,००० धावा पूर्ण केल्या आहेत.

५. डेविड वार्नर
ऑस्ट्रेलियाचा सलामी फलंदाज डेविड वार्नर त्याच्या आक्रमक आणि वेगाने धावा करण्याच्या शैलीसाठी ओळखला जातो. त्याने ऑस्ट्रेलियासाठी आतापर्यंत ८१ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने १ शतक आणि १८ अर्धशतकांच्या मदतीने २२६५ धावा केल्या आहेत. तसेच यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट १३९.७२ होता.

वार्नरच्या एकूण टी२० कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने २००७ पासून आतापर्यंत ३०६ सामने खेळले आहेत आणि यामध्ये ३०५ सामन्यात फलंदाजी केली आहे. या सामन्यांमध्ये त्याने १४०.७१ च्या स्ट्राइक रेटने १०,०१९ धावा केल्या असून ३८ वेळा नाबाद खेळी केली आहे. यामध्ये त्याच्या ८ शतकं आणि ८२ अर्धशतकांचा समावेश. त्याची सर्वोच्च धावसंख्या १३५ आहे.

४. विराट कोहली
भारतीय कर्णधार विराट कोहली त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीसाठी ओळखला जातो. विराटने भारतीय संघासाठी आतापर्यंत ९० टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने सर्वाधिक २८ अर्धशतकं केले आहेत आणि ३१५९ धावा केल्या आहे. विराट आंतरराष्ट्रीय टी २० सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.

विराटच्या एकूण टी२० कारकिर्दीचा विचार केला, तर विराटने त्याच्या आतापर्यंत ३१४ टी २० सामने खेळले आहेत आणि २९९ डावांमध्ये ५ शतक आणि ७४ अर्धशतकांच्या मदतीने १०,०३८ धावा केल्या आहेत. या धावा त्याने १३३.८५ च्या स्ट्रइक रेटसह आणि ४१.६५ च्या सरासरीने केल्या आहेत. आयपीएलमध्ये कोहलीने सर्वाधिक ६१८५ धावा केल्या आहेत.

३. शोएब मलिक
पाकिस्तनाचा माजी कर्णधार शोएब मलिक अनेक वर्षांपर्यंत पाकिस्तान संघाचा महत्वाचा भाग होता. त्याने पाकिस्तानसाठी त्याच्या कारकिर्दीत एकूण ११६ टी२० सामने खेळले आहेत आणि यामध्ये ८ अर्धशतकांच्या मदतीने २३३५ धावा केल्या आहेत. त्याने या धावा १२४.२० च्या स्ट्राइक रेटने केल्या आहेत

शोएबने एकूण २१ संघांसाठी ४३७ टी२० सामन्यांमध्ये ४०८ वेळा फलंदाजी केली आणि त्यापैकी १०८ वेळा तो नाबाद राहिला आहे. त्याने या सामन्यांमध्ये ६६ अर्धशतकांच्या मदतीने आणि १२५.७७ च्या स्ट्रइक रेटने १०,८३२ धावा केल्या आहेत. तो अजूनही काही संघांसाठी टी२० सामन्यांमध्ये खेळत आहे.

२. कायरन पोलार्ड
पोलार्ड वेस्टइंडीज संघाचा एक महत्वाचा आणि दमदार फलंदाज, तसेच सध्या त्याच्याकडे वेस्टइंडीज संघाचे नेतृत्व करण्याचीही जबाबदारी आहे. त्याने वेस्टइंडीज संघासाठी आतापर्यंत ८८ टी २० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि यामध्ये १३७८ धावा केल्या आहेत.

पोलार्ड आतापर्यंत एकूण १७ वेगवेगळ्या संघांसाठी खेळला आहे आणि आयपीएलमध्ये तो मुंबई इंडियन्सचा महत्वाचा खेळाडू आहे, ही गोष्ट सर्वांनाच माहित आहे. त्याने २००६ मध्ये टी२० क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती आणि आतापर्यंत एकूण ५६४ सामने खेळला आहे. यामध्ये त्याने ५०० वेळा फलंदाजी केली आणि १४६ वेळा नाबाद राहिला असून ११,२०२ धावा केल्या आहेत. या धावांमध्ये त्याच्या एका शतकाचा आणि ५६ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची सर्वाधिक धावसंख्या १०४ धावा आहे.

१. ख्रिस गेल
वेस्टइंडीजचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेलने त्याच्या देशासाठी आतापर्यंत ७४ आंतरराष्ट्रीय टी २० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने २ शतक आणि १४ अर्धशतकांच्या मदतीने आणि १३९.१८ च्या स्ट्रइक रेटने १८५४ धावा केल्या आहेत.

ख्रिस गेल त्याच्या देशाच्या क्रिकेट संघासाठी खेळलेल्या टी२० सामन्यांपेक्षा अधीक सामने फ्रेंचायझी संघांसाठी खेळला आहे. त्याने आतापर्यंत एकूण ४४७ टी २० सामने खेळले असून यामध्ये १४,२७५ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याचे २२ शतक आणि ८७ अर्धशतक सामील आहेत. त्याने टी२० क्रिकेटमधील सर्वोच्च धावा करण्याचा विक्रमही त्याच्याच नावावर आहे, जो नाबाद १७५ धावांचा आहे. तसेच त्याने टी २० क्रिकेटमध्ये सर्वाधिक ११०५ षटकारही मारले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

फॉर्ममध्ये परतण्याचे ‘हे’ आहे कारण, चहलने केला खुलासा; आता टी२० विश्वचषकासाठीही मिळू शकते संधी

‘आजही काहीच नाही बदललं यार!’ धोनीचा विजयी षटकार पाहून ‘या’ माजी खेळाडूने दिली प्रतिक्रिया

गेल्या तीन महिन्यांपासून गुलाबी चेंडू किटमध्ये घेऊन फिरली मंधना, ‘हे’ होते खास कारण 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---