मुंबई । ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड मालिकेच्या वेळापत्रकापाठोपाठ आता न्युझीलँड मालिकेचेही वेळापत्रक घोषित करण्यात आले आहे. ३ वन-डे, ३ टी२० आणि २ सराव सामने अशी ही मालिका आहे.
१७ ऑक्टोबरपासून हा दौरा सुरु होणार असून मुंबई, पुणे युपीसीए येथे वनडे सामने तर दिल्ली, राजकोट आणि तिरुअनंतपुरम येथे टी२० सामने होणार आहेत. ही मालिका ७ नोव्हेंबर रोजी संपेल. २० दिवसांच्या या भारत दौऱ्यात न्युझीलँड संघ २ सराव सामने धरून एकूण ८ सामने खेळणार आहे.
विशेष म्हणजे न्युझीलँडचा पहिला वनडे मुंबई येथे तर दुसरा वनडे पुण्यात होणार आहे. मुंबईतील ब्रेबॉन मैदानावर दोन सराव सामने होणार आहेत.
तत्पूर्वी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात भारत पाहुण्या ऑस्ट्रेलिया संघाबरोबर ५ वनडे आणि ३ टी२० सामने खेळणार आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेचे वेळापत्रक:
१२ सप्टेंबर । सराव सामना । चेन्नई
१७ सप्टेंबर । पहिली वनडे । चेन्नई
२१ सप्टेंबर । दुसरी वनडे । कोलकाता
२४ सप्टेंबर । तिसरी वनडे । इंदोर
२८ सप्टेंबर । चौथी वनडे । बेंगळुरू
१ ऑक्टोबर। पाचवी वनडे । नागपूर
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी२० मालिकेचे वेळापत्रक:
०७ ऑक्टोबर। पहिली टी२० । रांची
१० ऑक्टोबर। दुसरी टी२० । गुवाहाटी
१३ ऑक्टोबर। तिसरी टी २० । हैद्राबाद
न्युझीलँड विरुद्धच्या वनडे मालिकेचे वेळापत्रक:
१७ ऑक्टोबर । पहिला सराव सामना । ब्रेबॉन मुंबई
१९ ऑक्टोबर । सराव सराव सामना । ब्रेबॉन मुंबई
२२ ऑक्टोबर । पहिली वनडे । मुंबई
२५ ऑक्टोबर । दुसरी वनडे । पुणे
२९ ऑक्टोबर । तिसरी वनडे । युपीसीए
न्युझीलँड विरुद्धच्या टी२० मालिकेचे वेळापत्रक:
०१ नोव्हेंबर। पहिली टी२० । दिल्ली
०४ नोव्हेंबर। दुसरी टी२० । राजकोट
०७ नोव्हेंबर। तिसरी टी २० । तिरुणानंतरपूरम