मंगळवारी (दि. 18 एप्रिल) हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर सनरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स संघात आयपीएल 2023चा 25वा सामना पार पडला. या सामन्यात मुंबईने 14 धावांनी शानदार विजय मिळवत सलग तिसरा विजय साकारला. या विजयानंतर मुंबईला गुणतालिकेतही चांगला फायदा झाला. मुंबईच्या या विजयात फलंदाजांसोबतच गोलंदाजांचेही मोलाचे योगदान राहिले. मुंबईच्या विजयाचा हिरो कॅमरून ग्रीन ठरला. त्याने अर्धशतक झळकावले. त्यानंतर हैदराबादच्या डावातील अखेरच्या षटकात अर्जुन तेंडुलकर याने शानदार गोलंदाजी करत मैफील लुटली. या सामन्यानंतर अर्जुनने मोठी प्रतिक्रिया दिली.
मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाकडून सनरायझर्स हैदराबादच्या डावातील अखेरचे षटक अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) याने टाकले. अखेरच्या षटकात हैदराबादला विजयासाठी 20 धावांची गरज होती, पण अर्जुनने फक्त 6 धावा दिल्या आणि भुवनेश्वर कुमार याच्या रूपात आयपीएलमधील पहिली विकेट घेतली.
🎯✅ YESSSSS, MAIDEN WICKET FOR ARJUN!#OneFamily #SRHvMI #MumbaiMeriJaan #MumbaiIndians #IPL2023 #TATAIPL pic.twitter.com/uIuD3tY5w1
— Mumbai Indians (@mipaltan) April 18, 2023
या शानदार विजयानंतर अर्जुनने सांगितले की, त्याने त्याच्या गोलंदाजीत रिलीज आणि योग्य टप्प्यावर लक्ष केंद्रित केले. 23वर्षीय अर्जुन म्हणाला की, “मी पहिली विकेट घेणे माझ्यासाठी चांगले ठरले. मी फक्त योजनेवर काम केले. शेवटच्या षटकात योजना स्पष्ट होती की, सीमारेषेच्या पलीकडे चेंडू जाऊ द्यायचा नाही.”
पुढे बोलताना तो म्हणाला की, “मला गोलंदाजी करायला आवडते, मला फक्त माझे सर्वोत्तम द्यायचे आहे. मला आनंद आहे की, जेव्हाही कर्णधाराने मला गोलंदाजी करण्याची संधी देतो, तेव्हा मी संघाच्या योजनेवर अडून राहतो. तसेच, माझे सर्वोत्तम देतो. मी फक्त चेंडू रिलीज करण्यावर लक्ष देतो. तसेच, चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली. जर स्विंग झाला, तर हा एक बोनसच आहे. जर असे झाले नाही, तर ठीक आहे.”
वडील सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांच्यासोबत क्रिकेटविषयी काय चर्चा करतो, असा प्रश्न अर्जुनला विचारण्यात आला. यावर तो म्हणाला की, “आम्ही क्रिकेटवर चर्चा करत असतो, आम्ही सामन्यापूर्वी रणनीतीवर चर्चा करतो. जिथे स्विंगचा विषय येतो, तिथे मी फक्त वेगावर लक्ष देतो.”
Hat-trick of wins, and we are in 𝓟𝓐𝓡𝓐𝓓𝓘𝓢𝓔 😉#OneFamily #SRHvMI #MumbaiMeriJaan #MumbaiIndians #IPL2023 #TATAIPL pic.twitter.com/0mBm5Wt33R
— Mumbai Indians (@mipaltan) April 18, 2023
अर्जुनने मुंबईच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याने या सामन्यात 2.5 षटके गोलंदाजी करताना 18 धावा खर्च करत 1 विकेट घेतली. या विजयामुळे मुंबई संघाने सलग तिसरा विजय मिळवत गुणतालिकेत सहावे स्थान पटकावले. (focused on my release bowling good lengths and lines upfront arjun tendulkar read more)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘या’ युवा खेळाडूचे नशीब फळफळणार! हैदराबादविरुद्धची कामगिरी पाहून रोहितही म्हणाला, ‘तो लवकरच…’
सर्वात मोठी बातमी! भारताविरुद्धच्या WTC फायनलसाठी ऑस्ट्रेलिया संघ घोषित, ‘या’ दिग्गजांचे पुनरागमन