लखनऊ सुपर जायंट्स वि. मुंबई इंडियन्स संघ बुधवारी (24 मे) चेन्नईच्या चेपॉक स्टेडिअमवर समोरासमोर आले. मुंबईने या सामन्यात लखनऊ संघाला अक्षरशः चारीमुंड्या चित करत 81 धावांनी मोठा विजय मिळवला. आता क्वालिफायर दोनमध्ये त्यांचा सामना गुजरात टायटन्सविरुद्ध होईल. या सामन्यानंतर लखनऊचा वेगवान गोलंदाज नवीन उल हक चांगलाच ट्रोल होऊ लागला आहे. प्रसिद्ध फूड डिलिव्हरी ॲप झोमॅटो व स्विगी यांनी देखील त्याच्यावर संधी सोडली नाही.
आपला पहिलाच आयपीएल हंगाम खेळत असताना अफगाणिस्तानचा नवीन उल हक हा सातत्याने चर्चेत राहिला. लखनऊ विरुद्ध आरसीबी या सामन्यात त्याने थेट विराट कोहलीशी पंगा घेतला होता. त्यानंतर मुंबईविरुद्ध विराट स्वस्तात बाद झाल्यावर त्याने आपण सामना पहात असतानाचे एक छायाचित्र पोस्ट केलेले. त्यावर गोड आंबे असे कॅप्शन दिलेले. त्यानंतरही तो सातत्याने आरसीबी व विराट यांना लक्ष करताना दिसला.
एलिमिनेटर सामन्यात त्याने चार बळी मिळवले असले तरी त्याच्या संघाला पराभूत व्हावे लागले. त्यामुळे लखनऊ संघ स्पर्धेतून बाहेर पडला. त्यानंतर सोशल मीडियावर त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे. प्रसिद्ध फूड डिलिव्हरी ऍप झोमॅटोने ट्विट करत लिहिले,
— zomato (@zomato) May 24, 2023
‘आंबे फार गोड नाहीत.’ यासोबत असलेल्या छायाचित्रामध्ये नवीन फलंदाजी करताना दिसतोय. तर स्विगी या दुसऱ्या फुल डिलिव्हरी ऍपनेही ट्विट करत लिहिले,
Someone from Bangalore has just ordered 10kg mangoes 🤔🤔🤔
— Swiggy Instamart (@SwiggyInstamart) May 24, 2023
‘आत्ताच बेंगलोरमधून कोणीतरी दहा किलो आंबे मागवले आहेत’
मुंबई विरुद्ध लखनऊ या सामन्यात नवीन याने बळी मिळवल्यानंतर आगळेवेगळे सेलिब्रेशन केले होते. त्यानंतर मुंबईचे खेळाडू संदीप वॉरियर, विष्णू विनोद व कुमार कार्तिकेय यांनी हेच सेलिब्रेशन कॉपी करताना समोर आंबे ठेवले होते. तसेच त्याला कॅप्शन देताना स्वीट सीजन मँगोज असे कॅप्शन दिले होते. मात्र, काही काळानंतर त्यांनी ही स्टोरी हटवली.
(Food Delivery Apps Swiggy Zomato Troll Naveen Ul Haq After Lucknow Supergiants Loss)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सुट्टी नाही! लखनऊ पराभूत होताच मुंबईच्या खेळाडूंनी उडवली नवीनची खिल्ली, सोशल मीडियावर जोरदार ट्रेंड
सहावी ट्रॉफी येतेय! प्ले ऑफ्स म्हणजे मुंबईचा विजय जवळपास पक्का, आकडेवारी पाहाच