अर्जेंटिनाचे महान फुटबॉलपटू दिओगो मॅरेडोना आणि वाद हे समिकरण काही नविन नाही.
दिओगो मॅरेडोना यांनी 2018 चा रशिया येथे होत असलेल्या फिफा विश्वचकात आणखी एक वाद ओढावून घेतला आहे.
शनिवार दि.16 जूनला फिफा विश्वचकाच्या ड गटातील अर्जेंटीना वि. आइसलॅड यांच्यात झालेल्या सामन्यावेळी हा सामना पाहण्यासाठी उपस्थित असलेले मॅरेडोना सिगार ओढत असल्याचे दिसले.
https://twitter.com/MrPengat/status/1008153465443348486
या विश्वचषकात मैदान आणि परीसरात तंबाकूजन्य पदार्थांचे सेवन करन्यावर बंदी आहे. याच बंदिचे मॅरेडोना यांनी उल्लघन केल्यामुळे सर्व स्तरातून त्यांच्यावर टिका होत आहे.
त्याचबरोबर मॅरेडोना यांच्यावर त्यांनी कोरीयन प्रेक्षकांकडे वंशभेदी हावभाव केल्याचेही आरोप होत आहे.
आयटीव्ही या इंग्लिश वृत्तववाहिनीच्या जॅकी ओटली या पत्रकाराच्या म्हणन्यानुसार मॅरेडोना यांनी कोरीयन प्रेक्षकांकडे बघत वंशभेदी हावभाव केले आहेत.
दिओगो मॅरे़डोना यांना फुटबॉल विश्वातील सर्वकालिन महान खेळाडू मानले जाते. त्यांच्या नेतृत्वाखाली अर्जेंटीना संघाने 1986 साली विश्वचषक जिंकला होता.
महत्वाच्या बातम्या-
-रशियातील फिफा विश्वचषकासाठी या भारतीयाने काढले तब्बल 15 लाखांचे कर्ज
– फिफा विश्वचषकासारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत त्याने चक्क नाकारली ‘मॅन आॅफ द मॅच’