आयपीएलच्या मागच्या हंगामात राजस्थान रॉयल्स संघ उपविजेता राहिला होता. यावर्षीही राजस्थानने हंगामाची सुरुवात चांगली केली आहे. पहिल्या तीन सामन्यांपैकी दोन सामने राजस्थानने जिंकले आणि गुणतालिकेत पहिला क्रमांक पटकावला. या विजयांमध्ये त्यांचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट याचे योगदान महत्वाचे राहिले. दरम्यान, बोल्टचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायर होत आहे. ज्यामधे तो हिंदीत एक खास डायलॉग बोलताना दिसतो.
ट्रेंट बोल्ट (Trent Boult) खासकरून नवीन चेंडूसह वरच्या फळीतील गोलंदाजांसाठी नेहमीच घातक ठरला आहे. आयपीएल 2023 (IPL 2023) च्या पहिल्या तीन सामन्यांमध्ये त्याने पाच विकेट्स घेतल्या आहेत. पंजाब किंग्जविरुद्ध त्याला विकेट मिळाली नाही. पण सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 2, तर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 3 विकेट्स त्याने घेतल्या. याच पार्श्वभूमीवर राजस्थानच्या (Rajasthan Royals) अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून बोल्टचा हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. व्हिडिओत बोल्ड म्हणतो की, “घाबरत नाही… जिम देखील करत नाही… ट्रेंट बोल्ड आहे… मनात आल्यानंतर क्रिकेटमध्ये फुटबॉल खेळवेल…”
https://www.instagram.com/reel/Cq2KDiXvJKx/?utm_source=ig_web_copy_link
पोस्टच्या कॅप्शनमध्ये 0-2 असे लिहिले आहे. त्याने मागच्या दोन्ही सामन्यांमध्ये विरोधी संघाच्या प्रत्येकी दोन-दोन फलंदाजांना शुन्यावर बाद केल्यामुळे असे कॅप्शन फ्रँचायझीकडून दिले गेले आहे. बोल्टला राजस्थान रॉयल्ससाठी आपला पुढचा सामना बुधवारी (12 एप्रिल) खेळायचा आहे. दरम्यान, राजस्थानने शेवटचा सामना शनिवारी (8 एप्रिल) दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळला. राजस्थानने हा सामना 57 विकेट्सने नावावर केला.
बोल्टच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीसह आयपीएल कारकीर्द देखील मोठी आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत त्याने 81 सामने खेळले असून 97 विकेट्स घेतल्या आहेत. राजस्थान रॉयल्सच्या आधी तो सनरायझर्स हैदराबाद, दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स संघासाठी खेळला आहे. (Football in cricket! Rajasthan Royals shared a funny video of Trent Boult)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
थेट अमेरिकन पॉर्नस्टारचे रिंकूसाठी ट्विट! तीन शब्दांत केले ‘स्पेशल’ कौतुक
ट्रोल झाल्यानंतर तुषार देशपांडेचा ‘त्या’ वक्तव्याबाबत खुलासा! रोहितला बाद केल्यानंतर आलेला चर्चेत