स्वित्झर्लंडमध्ये युएफाच्या मुख्यालयात उपउपांत्य फेरीच्या सामन्यांचा ड्राॅ पार पडला. अंतिम ८ मध्ये आलेल्या संघांमधून कोणाला कोणता प्रतिस्पर्धी मिळतो यावर सगळ्यांचे लक्ष होते.
अंतिम १६ मधून ३ स्पॅनिश लीगचे संघ अंतिम ८ मध्ये दाखल झाले त्यात गतविजेते रियल मॅड्रिड बरोबर बार्सेलोना आणि मॅन्चेस्टर युनाएटेडला हरवत सेविल्लाने स्थान निश्चित केले.
तर ५ इंग्लिश संघातून केवळ २ संघांना अंतिम ८ मध्ये स्थान मिळवता आले त्यात मॅन्चेस्टर सिटी आणि लीवरपुलचा समावेश आहे.
या बरोबरच इटलीच्या आणि मागील वर्षीच्या उपविजेत्या जुवेंटस बरोबर रोमा या संघांनी सुद्धा स्थान मिळवले आहे. तर जर्मनीच्या बायर्न मुनिचने आपल्या लीग मधून एकमेव स्थान कायम ठेवले.
राऊंड १६ सारखे या उपउपांत्य फेरीच्या ड्राॅमध्ये एकच लीगच्या संघांमध्ये कसलेच बंधन नसते. सर्व संघांमधून कोणतेही दोन संघ एकमेकांविरुद्ध खेळतात. ड्राॅ सुरु झाला आणि पहिलाच सामना आपल्या लीगमध्ये अपराजित असलेल्या बार्सेलोना विरुद्ध २००८ नंतर पहिल्यांदा उपउपांत्य फेरीसाठी पात्र ठरलेल्या रोमामध्ये निश्चित झाला. दूसरा सामना सेविल्ला विरुद्ध बायर्न मुनिचचा असेल.
अंतिम ८ मधील सेविल्ला असा एकमेव संघ होता ज्यांचाविरुद्ध त्यांनी युएफा मध्ये सामना खेळला नव्हता.
तिसरे नाव मागीलववर्षीचा अंतिम सामना खेळणार्या जुवेंटस विरुद्ध रियल मॅड्रिडमध्ये होणार ठरले आणि मागील वर्षीच्या पराभवाचा वचपा जुवेंटस काढणार का? असा प्रश्न उभा राहिला. बुफाॅनचे युसीएलच्या विजेतेपदाचे स्वप्न या वर्षी तरी पुर्ण होणार का उपउपांत्य फेरीतच त्यांच्यावर बाहेर पडायची नामुष्की येते हे पहाण्यासारखे असेल. या आधी ४ वेळा जुवेंटसने मॅड्रिडला घरचा रस्ता दाखवला आहे.
तर उरलेल्या दोन इंग्लिश संघात सामना होणार आहे. मॅन्चेस्टर सिटीला पहिला पराभव दाखवणार्या लीवरपुल विरुद्ध त्यांचा सामना असेल. या बरोबरच मॅन्चेस्टर सिटी सातवा इंग्लिश संघ आहे जो लीवरपुल विरुद्ध युरोपच्या स्पर्धेत खेळणार आहे. २०१०/११ नंतर पहिल्यांदा दोन इंग्लिश संघ एकमेकांविरुद्ध उपउपांत्य फेरीत खेळतील या आधी चेल्सी आणि युनाएटेडचा सामना झाला होता.
सामन्यांचे वेळापत्रक खालील प्रमाणे:-
पहिला लेग ३ एप्रिल २०१८
सेविल्ला वि. बायर्न मुनिच
जुवेंटस वि. रियल मॅड्रिड
पहिला लेग ४ एप्रिल २०१८
बार्सेलोना वि. रोमा
लीवरपुल वि. मॅन्चेस्टर सिटी
दूसरा लेग १० एप्रिल २०१८
रोमा वि. बार्सेलोना
मॅन्चेस्टर सिटी वि. लीवरपुल
दूसरा लेग ११ एप्रिल २०१८
बायर्न मुनिच वि. सेविल्ला
रियल मॅड्रिड वि. जुवेंटस
The official result of the #UCLdraw.
Predict the final… 🤔 pic.twitter.com/YAlLd1tWJK
— UEFA Champions League (@ChampionsLeague) March 16, 2018
Mark this one in your diaries! 🗓️#UCLdraw pic.twitter.com/K9gd46oFza
— UEFA Champions League (@ChampionsLeague) March 16, 2018