Asia Cup 2025: आशिया कप 2025 ची सुरुवात 9 सप्टेंबरपासून होणार आहे. आशिया कपपूर्वी पाकिस्तानने अफगाणिस्तान आणि यूएईविरुद्ध त्रिकोणी मालिका खेळली. 7 सप्टेंबरला पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना झाला. पाकिस्तानने हा सामना तब्बल 75 धावांनी जिंकला.(Pakistan won this match by a whopping 75 runs)
आशिया कपपूर्वी पाकिस्तानच्या फिरकी गोलंदाजाने कमाल दाखवली. अंतिम सामन्यात मोहम्मद नवाजने 5 बळी घेतले आणि अफगाणिस्तानची वाट लावली. त्याने 4 षटकांत फक्त 19 धावा देत 5 फलंदाजांना बाद केले. आशिया कपपूर्वीच नवाजने आपली लय मिळवली आहे. पाकिस्तान आता नवाजला आपले प्रमुख शस्त्र बनवून आशिया कपमध्ये उतरू शकते.
आशिया कपमध्ये पाकिस्तान आपला पहिला सामना 12 सप्टेंबरला ओमानविरुद्ध खेळणार आहे. (Pakistan will play their first match in the Asia Cup against Oman on September 12). त्यानंतर 14 सप्टेंबरला दुबईत भारत-पाकिस्तान यांच्यात महामुकाबला रंगणार आहे.






