भारताचे माजी दिग्गज फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे यांचे नाव सध्या भारतीय मुख्य प्रशिक्षकपदासाठी चर्चेत आहे. सध्याचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ आगामी टी२० विश्वचषक संपल्यानंतर संपणार आहे. त्यानंतर भारतीय संघाला नवीन प्रशिक्षकाची आवश्यकता असणार आहे. त्यामुळे या पदासाठी आतापासूनच चर्चा सुरू असून अनिल कुंबळे आणि वीवीएस लक्ष्मण यांची नावे स्पर्ध्येत सर्वात पुढे असल्याचे सांगितले जात आहे. बीसीसीआय या दोघांना रवी शास्त्रींचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्यास सांगू शकते.
अनिल कुंबळे यापूर्वी २०१६-१७ मध्ये एका वर्षासाठी भारतीय संघाचे प्रशिक्षक राहिले आहेत. त्यांनी त्यावेळी कर्णधार विराटसोबत त्यांचे बिघडलेले संबंध आणि चॅम्पियन्स ट्राॅफीच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध झालेल्या पराभवामुळे पदाचा राजीनामा दिला होता.
विराट आणि कुंबळे यांच्यातील मतभेद मार्च २०१७ मध्ये सुरु झाले होते. यावेळी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिका खेळली जात होती. धर्मशाळा स्टेडियममधील कसोटी सामन्यादरम्यान हा वाद झाला होता. विराट कोहली दुखापतीमुळे सामन्यातून बाहेर झाला होता आणि संघाचे नेतृत्व अजिंक्य रहाणे करत होता. या सामन्यात फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला संधी दिली गेली होती आणि विराट या निर्णयाच्या विरोधात होता. विराट या सामन्यात अमित मिश्राला संधी देऊ इच्छित होता. पण प्रशिक्षकांनी विराटला न विचारता कुलदीपला खेळवण्याच्या निर्णय घेतला होता.
प्रशिक्षक कुंबळे आणि कर्णधार विराटमधील मतभेदांची काही प्रमुख कारणे
त्यावेळी असेही सांगितले गेले होते की, विराट माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला ग्रेड-ए मध्ये सामील केल्यामुळे नाराज झाला आहे. विराटच्या मते धोनीने त्यावेळी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यामुळे त्याला ग्रेड-ए मध्ये स्थान देणे योग्य नाही. मात्र, प्रशिक्षक अनिल कुंबळेचे मत विराटपेक्षा वेगळे होते.
अनिल कुंबळे प्रशिक्षक असताना संघाच्या शिस्तीबद्दल खूप कडक होते. त्यांनी अनेकदा सराव करताना खेळाडूंकडून चूका झाल्यावर त्यांना सुनावले होते. त्यांनी याबाबत एकदाही स्पष्ट मत मांडले नव्हते, पण अनेक दौऱ्यावर संघातील खेळाडूंबरोबर त्यांच्या गर्लफ्रेंड आणि पत्नी यांना सोबत घेऊन जाण्याच्याही ते विरोधात असायचे.
पुढे २०१७ मध्ये चॅम्पियन्स ट्राॅफीच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारतीय संघाला पराभूत केल्यानंतर कुंबळे आणि विराट यांच्यातील संबंध अणखीनच खराब झाले होते. विराटने स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या एक दिवस आधी क्रिकेट सल्लागार समितीला अनिल कुंबळेंविषयी स्पष्ट तक्रार केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
‘थाला’च्या आयपीएल अध्यायाचा यंदा होणार शेवट? सीएसके कर्णधाराच्या कारकिर्दीविषयी भविष्यवाणी
आजच्या लढतीत धोनीच्या किंग्सवर भारी पडणार रोहितची पलटण! ही आकडेवारी पाहून पटेल खात्री
दौरा रद्द केल्यानंतर न्यूझीलंड संघाची पाकिस्तानातून दुबईत सुखरुप लँडिग, ‘या’ दिवशी जाणार मायदेशी