भारतीय संघाला यवर्षी मायदेशातील वनडे विश्वचषक जिंकण्यासाठी पूर्ण प्रयत्न करावे लागतील. भारताने 2013 नंतर मागच्या 10 वर्षांमध्ये एकही आयसीसी ट्रॉफी जिंकली नाहीये. अशात यावर्षी हा दुष्काल संपवण्यासाठी प्रयत्न करेल. भारताचा माजी दिग्गज आणि 2011 विश्वचषक विजेत्या संघाचा भाग असलेल्या विरेंद्र सेहवागने खास प्रतिक्रिया दिली. सेहवागच्या मते भारतीय संघाने विराट कोहलीसाठी यावर्षी विश्वचषक जिंकला पाहिजे.
आयसीसी वनडे विश्वचषक 2011चे यजमानपद भारताकडे होते. त्यावेळी अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेला मात देत इतिहासात दुसऱ्यांदा वनडे विश्वचषक जिंकला. विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) आणि विराट कोहली (Virat Kohli) देखील या विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होते. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याचा हा शेवटचा विश्वचषक असल्यामुळे संघाने ट्रॉफी जिंकण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले आणि त्यांना यश मिळाले. याच पार्श्वभूमीवर सेहवागने आगामी विश्वचषकापूर्वी खास प्रतिक्रिया दिली. “आणि तेंडुलकरसाठी विश्वचषक खेळलो होतो. आम्ही विश्वचषक जिंकला आणि सचिनसाठी हा चांगला निरोप राहिला होता,” असे सेहवाग म्हणाला.
सेहवाग पुढे म्हणाला की, “आता विराट कोहली सचिन तेंडुलकर जागी आहे. तू पूर्ण उत्साहाने क्रिकेट खेळतो. दुसऱ्यांची काळजी घेतो. प्रत्येकाला विराट कोहलीसाठी हा विश्वचषक जिंकायचा आहे. विराट कोहलीत काहीच बदल झाला नाहीये. तो नेहमीच संघालासाठी 100 टक्के योगदान देतो. मला तर वाटते विराटचीही विश्वचषक जिंकण्याची चांगलीच इच्छा आहे.”
दरम्यान, मंगळवारी (27 जून) बीसीसीआयने या वनडे विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केले. येत्या 5 ऑक्टोबर रोजी इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याने वनडे विश्वचषक 2023 स्पर्धा सुरू होईल. उभय संघांतील हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडले. स्पर्धेचा अंतिम सामना देखील 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादमध्येच खेळवला जाईल. भारतीय संग या विश्वचषक स्पर्धेत 8 ऑक्टोबर रोहिची ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपला पहिला सामना खेळेल. (For Virat Kohli, India must win the 2023 ODI World Cup)
महत्वाच्या बातम्या –
विश्वचषकात वापरली जाणारी राउंड रॉबिन पद्धत आहे तरी काय? वाढवणार टीम इंडियाची चिंता
ASHES 2023 । दुसऱ्या कसोटीतून मोईन अलीचा पत्ता कट! ‘या’ इंग्लिश गोलंदाजाला मिळाले संघात स्थान