भारतात सध्या कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. भारतात हे कोरोनाचे संकट मोठे होण्याच्या काही दिवसांपूर्वीच इंडियन प्रीमीयर लीगच्या १४ व्या हंगामाला सुरुवात झाली होती. पण हा हंगाम सुरु असतानाच भारतातही कोरोनाचे संकट मोठे होत गेले. त्याच्या फटका आयपीएलच्या १४ व्या हंगामालाही बसला. ही स्पर्धा सुरु असताना संघांच्या बायोबबलमध्ये कोरोनाचा प्रवेश झाल्याने अखेर मंगळवारी ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली.
आयपीएलचा १४ वा हंगाम स्थगित झाल्याने परदेशी खेळाडू, प्रशिक्षक आणि समोलोचक हळूहळू आपापल्या मायदेशी परतू लागले आहेत. केवळ ऑस्ट्रेलियन सदस्य भारतातून मालदीवला जातील तेथून ते १४ दिवसांच्या क्वारंटाईनंतर मायदेशी रवाना होतील. त्यामुळे सध्या भारतातील कठीण परिस्थिती पाहून या देशाला सोडून जाताने अनेक आजी-माजी परदेशी दिग्गजांनी हळहळ व्यक्त केली आहे.
राजस्थान रॉयल्सचा यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलरने ट्विटमध्ये म्हटले आहे की ‘‘भारत हा एक विशेष देश आहे, जो यावेळी मोठ्या संकटातून जात आहे. माझं आणि माझ्या कुटुंबाच नेहमीप्रमाणेच स्वागत करण्यासाठी पुन्हा एकदा धन्यवाद. कृपया सुरक्षित रहा व एकमेकांची काळजी घ्या.’
https://twitter.com/josbuttler/status/1390000046234558470
तसेच फाफ डू प्लेसिसने इंस्टाग्रामवर पोस्ट करताना लिहिले आहे की ‘आयपीएल आणि चेन्नई सुपर किंग्स कुटुंबाला सोडून जाताना वाईट वाटत आहे. या हंगामात संघ चांगल्या फॉर्ममध्ये होता. सध्याच्या परिस्थितीत माझ्या प्रार्थना भारतातील लोकांबरोबर असतील. स्वत:ची काळजी घ्या.’
https://www.instagram.com/p/COf7YmcHSlY/?utm_source=ig_embed
न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक सायमन डूलने तर भारताला अशा कठीण परिस्थिती सोडून जाण्याबद्दल माफी मागितली आहे.
त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की ‘प्रिय भारत, तुम्ही मला इतक्यावर्षीत खुप काही दिले आहे आणि मी अशा कठीण परिस्थितीत तुम्हाला सोडून जात आहे, त्याबद्दल माफी मागतो. जे या कठीण परिस्थितीतून जात आहे त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी मी सहानुभूती व्यक्त करतो. सुरक्षित राहाण्यासाठी शक्य ते सर्व करा. पुन्हा भेटू, काळजी घ्या.’
https://twitter.com/Sdoull/status/1389935229058510849
याबरोबर ऑस्ट्रेलियाची माजी क्रिकेटपटू लिसा स्थळेकरने ट्विट केले आहे की ‘मी आज दु:खद मनाने भारताचा निरोप घेत आहे. मला माहित आहे तुम्ही सर्व जण दुखावलेले आहात. मी तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी शक्य ते सर्वकाही करेल आणि शक्य तितक्या लवकर मी पुन्हा येईल, तुमच्याबरोबर पुन्हा उभी राहिल.’
https://twitter.com/sthalekar93/status/1390291822275031043
याव्यतिरिक्त देखील डेव्हिड मिलर, टॉम मूडी, सॅम करन अशा अनेक क्रिकेटपटूंनी भारताचा निरोप घेताना भावूक पोस्ट केले आहेत.
https://twitter.com/alanwilkins22/status/1390136175977852930
https://twitter.com/TomMoodyCricket/status/1390144965070573569
https://twitter.com/rashidkhan_19/status/1390276244781117447
https://twitter.com/DavidMillerSA12/status/1390022827886092288
https://www.instagram.com/p/COiARM3jtPY/
आयपीएल २०२१ सुरु असताना झाला कोरोनाचा शिरकाव
मंगळवारी दिल्ली कॅपिटल्सचा गोलंदाज अमित मिश्रा आणि सनरायझर्स हैदराबादचा यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. तसेच चेन्नई सुपर किंग्सचा फलंदाजी प्रशिक्षक मायकल हसी देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळला.
एवढेच नाही तर सोमवारी कोलकाताच्या वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर या खेळाडूंशिवाय चेन्नईचा गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी आणि चेन्नई संघाची बस सफाई करणारा कर्मचारी त्याचबरोबर अरुण जेटली स्टेडियममधील ५ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यामुळे कोरोना व्हायरसचा संघांच्या बायोबबलमध्ये झालेला शिरकाव पाहाता अखेर हा हंगाम स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआय आणि आयपीएलला घ्यावा लागला.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएलच्या उर्वरित १४ व्या हंगामाचे आयोजन होणार इंग्लंडमध्ये? पाहा काय आहे प्रकरण