जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याला 18 जूनपासून सुरुवात होणार आहे. भारत आणि न्यूझीलंडच्या संघांत होणाऱ्या या बहुप्रतिक्षित सामन्यासाठी दोन्ही संघांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. तसेच या सामन्यानंतर भारताला इंग्लंडविरुद्ध 5 कसोटी सामन्यांची मालिका देखील खेळायची आहे. या सामन्यांसाठी भारताने 20 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या इंग्लंड दौऱ्याबद्दल अनेक माजी क्रिकेटपटूंननी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
भारतीय संघात निवड बरेच खेळाडू पहिल्यांदा इंग्लंडचा दौरा करणार आहे, तर बऱ्याच खेळाडूंनी यापूर्वीही इंग्लंडचा दौरा केलेला आहे. या खेळाडूंपैकी सलामीवीर शुभमन गिल, मयंक अगरवाल, वॉशिंग्टन सुंदर आणि मोहम्मद सिराज हे प्रथमच इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहेत. भारतीय संघातील खेळाडू कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांचा हा इंग्लंडचा तिसरा दौरा असणार आहे. भारतीय संघाला या तिघांकडून फलंदाजीत मोठ्या अपेक्षा असणार आहेत.
दरम्यान, नुकतेच भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू विजय भारद्वाज यांनी मोठी प्रतिक्रिया दिली असून, त्यांच्यामते या दौऱ्यावर सर्वाधिक दबाव हा अजिंक्यवर असणार आहे.
“स्पोर्टकिडाला” दिलेल्या मुलाखतीत विजय म्हणाले, ‘अजिंक्यवर खूप दबाव असणार आहे. दुर्दैवाने त्याने अपेक्षेनुसार कामगिरी केलेली नाही. तसेच अजिंक्य सध्या मोठ्या प्रमाणात संघर्ष करत आहे.”
अजिंक्यने इंग्लंड दौऱ्यात फलंदाजीत शानदार कामगिरी केली नसली, तरी ऑस्ट्रेलिया दौर्यावरील 2-1 च्या ऐतिहासिक कसोटी मालिकेच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
विजय म्हणाले, “अजिंक्यलाही वेगवानरित्या धावा कराव्या लागतील. कारण, तुमचा एक फलंदाज फार संथ खेळू नये अशी तुमची अपेक्षा असते. अंतिम सामना अनिर्णित राहिला तर संघांना ट्रॉफी शेयर करावी लागणार आहे. कसोटी अजिंक्यपद जिंकण्यासाठी आपल्या फलंदाजांना आक्रमक फलंदाजी करणे आवश्यक आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, रिषभ पंत प्रमाणेच अजिंक्यला आक्रमक फलंदाजी करावी लागेल.”
महत्त्वाच्या बातम्या –
तब्बल ७ वर्षांनंतर कसोटी खेळण्यास भारतीय महिला संघ सज्ज, पाहा ‘अशी’ आहे नवी जर्सी
‘ऑस्ट्रेलियाला चकित होण्याची गरज नाही, त्यांना भारताचे स्टँडबाय खेळाडूसुद्धा पराभूत करतील’
धोनी की विराट? कोण आहे भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार, पाहा आकडेवारी