माजी अमेरिकन फुटबॉलपटू आणि अभिनेते ओ.जे. सिम्पसन यांचं निधन झालं आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी गुरुवारी (7 एप्रिल) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करून याची पुष्टी केली. पोस्टनुसार, सिम्पसन यांचं निधन झालं तेव्हा त्यांची मुलं आणि नातवंड त्यांच्यासोबत होते. सिम्पसन यांनी वयाच्या 76 व्या वर्षी कॅन्सरमुळे अखेरचा श्वास घेतला.
ओ.जे. सिम्पसनवर पत्नी आणि तिच्या मित्राची हत्या केल्याचा आरोप होता. मात्र 1995 मध्ये त्यांना खुनाच्या आरोपातून निर्दोष मुक्त करण्यात आलं. सिम्पसन यांच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्या निधनाची माहिती सोशल मीडिया पोस्ट द्वारे शेअर केली आहे. “10 एप्रिल रोजी आमचे वडील ओरेंथल जेम्स सिम्पसन कर्करोगाशी लढा देताना हे जग सोडून गेले”, असं या पोस्टमध्ये लिहिलंय. पोस्टमध्ये पुढे लिहिलं आहे की, ‘निधनाच्या वेळी ते त्यांचे मुलं आणि नातवंडांसोबत होते.
ओ.जे. सिम्पसन यांच्याबद्दल बोलायचं झालं तर, ते सॅन फ्रान्सिस्कोमधील एका सार्वजनिक निवासस्थानात लहानाचे मोठे झाले होते. त्यानंतर त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियामध्ये प्रवेश घेतला. 1968 मध्ये कॉलेज फुटबॉलचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून त्यांनी ‘हेझमन ट्रॉफी’ जिंकली. ते एनएफएल ‘हॉल ऑफ फेमर’ही बनले. एका हंगामात 2,000 यार्डचं अंतर कापणारे ते पहिले खेळाडू होते.
ओ.जे. सिम्पसन यांनी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. याशिवाय त्यांनी रेंट-ए-कार कंपनी पिचमन आणि फुटबॉल समालोचक म्हणूनही काम केलंय. ओ.जे. सिम्पसन यांनी 60 च्या दशकाच्या उत्तरार्धात ‘ड्रॅगनेट’, ‘इट टेक्स अ थीफ’, ‘मेडिकल सेंटर’ आणि ‘आयरनसाइड’ इत्यादी टीव्ही मालिकांमध्ये पाहुणे कलाकार म्हणून भूमिका केल्या. ते 1983-85 पासून ‘एबीसी’च्या मेगास्टार मंडे नाईट फुटबॉलसाठी समालोचक म्हणून होते.
सिम्पसन 1995 मध्ये एका सनसनाटी दुहेरी-हत्याकांडामुळे जगभरात प्रसिद्धीझोतात आले होते. ते लॉस एंजेलिसमध्ये त्यांची पत्नी निकोल ब्राउन आणि तिचा मित्र रोनाल्ड गोल्डमन यांच्या हत्येच्या खटल्यात निर्दोष सुटले होते. मात्र दिवाणी न्यायालयानं त्यांना दोषी ठरवलं होतं. 2008 मध्ये सशस्त्र दरोड्याच्या 12 गुन्ह्यांमध्ये दोषी आढळल्यानंतर ते नेवाडा तुरुंगात नऊ वर्ष कैद होते.
महत्त्वाच्या बातम्या-
“याला वर्ल्डकप खेळायचा आहे”, तुफानी फटकेबाजी करणाऱ्या दिनेश कार्तिकची रोहितनं मैदानावरच खेचली!