भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघातील 5 सामन्यांच्या बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी (Border Gavaskar Trophy) स्पर्धेला काही दिवस उरले आहेत. दोन्ही संघ पहिल्या कसोटीसाठी (22 नोव्हेंबर) रोजी पर्थच्या मैदानावर भिडणार आहेत. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल जाॅन्सनने (Mitchell Johnson) सध्या खराब फाॅर्मशी झुंज देत असलेला दिग्गज फलंदाज विराट कोहलीचे (Virat Kohli) समर्थन केले आहे.
विराट कोहलीने (Virat Kohli) 2024 मध्ये 6 कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याची सरासरी 22.72 राहिली आहे. कसोटी सामन्यांमध्ये या दिग्गज फलंदाजाची कारकिर्दीची सरासरी 47.83 आहे. ऑस्ट्रेलियातील मागील 4 दौऱ्यांमध्ये त्याने 54.08च्या सरासरीने धावा केल्या आहेत. पण यावेळी त्याची घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरूद्ध खराब कामगिरी राहिली. न्यूझीलंडविरूद्धच्या घरच्या मालिकेत भारताचा 3-0 असा पराभव झाला. ज्यामध्ये कोहलीने एकूण 91 धावा केल्या.
मिचेल जॉन्सनने (Mitchell Johnson) रविवारी (17 नोव्हेंबर) ‘द वेस्ट ऑस्ट्रेलियन’मधील आपल्या स्तंभात लिहिले, “अलीकडच्या काळात कोहलीचा फॉर्म फारसा चांगला नाही. मला आश्चर्य वाटते की ही परिस्थिती त्याला आवश्यक असलेला दृढनिश्चय देईल की त्याला अधिक दबावाखाली आणेल. एक चाहता म्हणून, मला कदाचित त्याला ऑस्ट्रेलियात आणखी एक कसोटी शतक झळकावताना बघायला आवडेल.”
ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटी सलामीवीर डेव्हिड वॉर्नरनेही (David Warner) असेच मत व्यक्त केले आहे. त्याने रविवारी (17 नोव्हेंबर) हेराल्ड सनमधील आपल्या स्तंभात लिहिले की, “भारतासाठी या महत्त्वाच्या मालिकेत प्रगतीचे दडपण कोहलीला नवीन उंची गाठण्यासाठी प्रेरित करू शकते. या महिन्यात न्यूझीलंडविरूद्धच्या कसोटी मालिकेत भारताचा 3-0 असा पराभव झाल्यानंतर लोक विराट संपल्याचा विचार करत आहेत, पण मी ऑस्ट्रेलियासाठी चिंतेत आहे.”
विराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने भारतासाठी कसोटीत 2011 साली पदार्पण केले होते. तेव्हापासून आतापर्यंत त्याने 118 कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 201 डावात फलंदाजी करताना 47.83च्या सरासरीने 9,040 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 254 राहिली आहे. कसोटीत त्याने 31 अर्धशतकांसह 29 शतके झळकावली आहेत. तर 7 द्विशतके देखील झळकावली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
BGT; दुखापतीबद्दल केएल राहुलचे मोठे वक्तव्य म्हणाला, “पहिल्या कसोटीसाठी मी….”
हार्दिक पांड्याला पर्याय मिळाला! हा युवा अष्टपैलू खेळाडू करणार पहिल्या कसोटीत पदार्पण
आयपीएल मेगा लिलाव लाईव्ह कधी आणि कोणत्या चॅनलवर पाहता येणार? सर्वकाही जाणून घ्या