सध्या भारत-ऑस्ट्रेलिया संघात 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर मालिका खेळली जात आहे. त्यातील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना सिडनीच्या मैदानावर रंगला आहे. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाचा युवा खेळाडू ‘सॅम कोन्स्टास’ने (Sam Konstas) मेलबर्न येथील चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण कसोटी सामना खेळला होता. ज्यामध्ये त्याने आपल्या विस्फोटक फलंदाजीने भारतीय गोलंदाजांना खूप त्रास दिला.
यादरम्यान ‘जसप्रीत बुमराह’ची (Jasprit Bumrah) गोलंदाजीही त्याच्यासमोर काही खास करू शकली नाही. आता ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ‘शेन वॉटसन’ने (Shane Watson) कोन्स्टासच्या विस्फोटक पदार्पणाच्या खेळीचे कौतुक केले आहे.
सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दौऱ्याबाबत शेन वॉटसन (Shane Watson) म्हणाला, “मला त्यांचा गेम प्लॅन काय आहेय़ प्लॅन ए काय होता हे समजले. त्यामुळे काही षटकातच प्लॅन बी आला तेव्हा मला त्यांचा गेम प्लॅन काय आहे हे समजले. पण एका गोष्टीवर आम्ही नेहमी चर्चा करतो ती म्हणजे तुमच्यावर विश्वास ठेवणे.”
सॅम कोन्स्टाससोबतच्या अनुभवाविषयी बोलताना शेन वॉटसन म्हणाला, “सॅमसोबत काम करताना मला वाटले की तो खूप शांत आणि एकत्रित माणूस आहे, जो खोलवर विचार करतो आणि जास्त बोलत नाही. पण कसोटी सामन्यात आम्ही पाहिले की तो पूर्णपणे वेगळा आहे. त्याने दडपण न घेता चमकदार कामगिरी केली आणि आपली क्षमता दाखवली.”
भारत-ऑस्ट्रेलिया चौथ्या कसोटीतील पहिल्या डावात सॅम कॉन्स्टासने 65 चेंडूत 92.30च्या स्ट्राईक रेटने 60 धावा केल्या. दरम्यान त्याने 6 चौकारांसह 2 षटकार लगावले. दुसऱ्या डावात 18 चेंडूत 8 धावा करून कोन्स्टास जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर बाद झाला.
पुढे बोलताना शेन वॉटसन म्हणाला, “सॅमला मोठ्या स्टेजवर खेळण्याचा आत्मविश्वास आहे. तो तांत्रिकदृष्ट्या खूप मजबूत आहे आणि लूज बॉल्सची वाट पाहतो. त्याच्याकडे बॉल जमिनीवर मारण्याची क्षमताही आहे. मात्र, जेव्हा फील्ड सेट होते आणि जर रॅम्प शॉटसारखे पर्याय कापले गेले तर तो स्वत:ला कसा समायोजित करतो हे पाहणे मनोरंजक असेल.”
महत्त्वाच्या बातम्या-
कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाची अवस्था वेस्ट इंडिजपेक्षाही वाईट, दोन वर्षांत पाचव्यांदा असं घडलं
पहिल्या दिवसाच्या शेवटच्या बॉलवर राडा! नवख्या कॉन्स्टन्सला बुमराहनं शिकवला धडा
भारतीय क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा, सिडनी कसोटी दरम्यान धक्कादायक बातमी समोर