---Advertisement---

AUS vs SA: WTC फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला होणार मोठा फायदा? माजी कर्णधाराचा मोठा खुलासा

On: रविवार, जून 8, 2025 4:49 PM
---Advertisement---

Australia vs South Africa WTC Final: 2025च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघ आमने-सामने असणार आहेत. यादरम्यान माजी क्रिकेटपटू आरोन फिंचचा असा विश्वास आहे की ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीला दक्षिण आफ्रिकेपेक्षा थोडीशी आघाडी आहे, कारण ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना इंग्लंडमध्ये कसोटी खेळण्याचा अधिक अनुभव आहे. (11 ते 15 जून) दरम्यान लॉर्ड्सच्या मैदानावर होणाऱ्या WTC फायनलचे जेतेपद उंचावण्यासाठी हे दोन्ही संघ मैदानावर घाम गाळताना दिसतील.

आरोन फिंच स्टार स्पोर्ट्सवर बोलताना म्हणाला, “दोन्ही संघांची गोलंदाजी खूप मजबूत आहे. ऑस्ट्रेलियाकडे मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड आणि स्कॉट बोलँडसारखे गोलंदाज आहेत. त्यांच्यासोबत नॅथन लायन देखील आहे जो फिरकी गोलंदाज आहे. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेकडे कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी, मार्को जॅन्सन आणि केशव महाराजसारखे चांगले गोलंदाज आहेत.”

ऑस्ट्रेलियाने 2023 मध्ये भारताला हरवून WTC चे विजेतेपद जिंकले. तेव्हा पॅट कमिन्स संघाचा कर्णधार होता. त्याच्या नेतृत्वाखाली संघाची कामगिरी सातत्याने चांगली राहिली आहे. विशेषतः जेव्हा ऑस्ट्रेलियाने घरच्या मैदानावर भारताला 3-1 असे हरवून 10 वर्षांनी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकली. 2023-25 च्या WTC स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत 6 पैकी 4 मालिका जिंकल्या आहेत.

2021 मध्ये टी20 विश्वचषक जिंकणारा कर्णधार अ‍ॅरॉन फिंच होता. पॅट कमिन्सच्या कर्णधारपदाचे कौतुक करताना तो म्हणाला, “कमिन्सचे कर्णधारपद उत्कृष्ट आहे. तो दररोज सुधारत आहे. केवळ मैदानावरच नाही तर मैदानाबाहेरही तो संघाला चांगल्या प्रकारे हाताळतो. आंतरराष्ट्रीय संघाच्या कर्णधारासाठी संघाला एकजूट ठेवणे खूप महत्वाचे आहे. त्याची आणि प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्डची जोडी ऑस्ट्रेलियन क्रिकेटसाठी उत्तम ठरत आहे.”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---