---Advertisement---

Video: चक्क ऑस्ट्रेलियाचा विश्वविजेता प्रशिक्षक देणार उत्तराखंडच्या जूनियर बुमराहला प्रशिक्षण

On: रविवार, मार्च 14, 2021 9:21 PM
---Advertisement---

सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात कोणीही अल्पावधीत प्रसिद्ध होतो. एक छोटासा व्हिडिओ अथवा छायाचित्र हे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ती व्यक्ती अथवा ठिकाण प्रसिद्धीझोतात येते. असेच काहीसे उत्तराखंडच्या सात वर्षीय अक्षज त्रिपाठीसोबत घडले. सोशल मीडियावर त्याची गोलंदाजी पाहून चक्क ऑस्ट्रेलियाच्या विश्वविजेत्या प्रशिक्षकाने त्याला प्रशिक्षण देण्याचे कबूल केले आहे.

उत्तराखंडचा जूनियर बुमराह
मागील वर्षी एका लहान मुलाचा बुमराहप्रमाणे गोलंदाजी करण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. डेहराडून जवळील अगस्तमुनि तालुक्यातील चोप्रा गावच्या अक्षज त्रिपाठी याचा हा व्हिडिओ होता. इंस्टाग्राम ,फेसबुक आणि ट्विटरद्वारे लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला. या व्हिडिओचे इंग्लंडचे प्रशिक्षक पॉल निक्सन यांनी कौतुक केले होते. त्यानंतर, अक्षज याला ‘जूनियर बुमराह’ म्हणून संबोधण्यास सुरुवात झाली.

ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक देणार प्रशिक्षण
अक्षज त्रिपाठी याचा हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑस्ट्रेलियाला २००३ व २००७ चा वनडे विश्वचषक जिंकून देणाऱ्या जॉन बुकानन यांच्यापर्यंत पोहोचला. त्यानंतर, त्यांनी कोलकत्ता व नवी दिल्ली येथील त्यांच्या सहकाऱ्यांनी अक्षजचे वडील द्वारकाप्रसाद यांच्याशी संपर्क केला.

बुकानन हे अक्षजला प्रशिक्षण देण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी म्हटले. बुकानन यांच्या सहकाऱ्यांनी अक्षजसोबत एक्स व्हिडीओ देखील शूट केला आहे. स्वतः बुकानन आगामी सप्टेंबर महिन्यात अक्षजची भेट घेतील. त्याचबरोबर, अक्षजचा लवकरच उत्तराखंडच्या १४ वर्षाखालील संघात समावेश करण्यात येणार आहे.

जगातील सर्वात यशस्वी प्रशिक्षकांपैकी आहेत बुकानन
ऑस्ट्रेलियाचे प्रथमश्रेणी खेळाडू राहिलेले जॉन बुकानन हे जगातील सर्वात यशस्वी क्रिकेट प्रशिक्षकांपैकी एक मानले जातात. ऑस्ट्रेलियाने मिळवलेल्या विश्वविक्रमी सलग १६ कसोटी विजयांवेळी तसेच, २००३ आणि २००७ वनडे विश्वविजयावेळी ते ऑस्ट्रेलिया संघाचे प्रशिक्षक होते. २००७ विश्वचषकानंतर त्यांनी ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षकपद सोडले. २००८ मध्ये आयपीएलच्या पहिल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाचे प्रशिक्षकपद त्यांनी भूषविले होते.

महत्त्वाच्या बातम्या –

युवराजने सलग पाचवा षटकार न मारण्यामागे होते ‘हे’ कारण; स्वत:च केला खुलासा

‘भूवी’ के वार से बचना नामुमकीन! विकेट वाचवण्याचा बटलरचा प्रयत्न व्यर्थ, ‘असा’ झाला शून्यावर पायचित

विजय हजारे ट्रॉफी २०२१: यंदा अनेक नव्या विक्रमांचा नांदी, वाचा खास आकडेवारी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---