भारतीय संघाकडून गेल्या काही महिन्यात युवा खेळाडूंनी शानदार कामगिरी केली आहे. यात वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचा देखील समावेश आहे. त्यानेही त्याच्या वेगवान गोलंदाजीने अनेक फलंदाजांना त्रास देत त्याची प्रतिभा सिद्ध केली आहे. त्यामुळे त्याचे अनेकांनी कौतुकही केले आहे. आता यात ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉगचाही समावेश झाला आहे.
ब्रॅड हॉगने भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली आहे. ब्रॅड हॉगने म्हटले आहे की, सिराज आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या बळावर हळूहळू भारताचा दुसऱ्या पसंतीचा गोलंदाज बनत आहे.
मोहम्मद सिराजने इंग्लंडविरुद्ध नॉटिंघम कसोटी सामन्यात पहिल्या डावात एक आणि दुसऱ्या डावात दोन बळी घेतले. त्याने योग्य ठिकाणी गोलंदाजी केली आणि फलंदाजांना खूप त्रास दिला. यासाठी त्याचे खूप कौतुक झाले. मोहम्मद सिराजने जबरदस्त गोलंदाजी केल्याने ब्रॅड हॉग खूप प्रभावित झाला.
त्यानी ट्वीट करत म्हटले आहे की, “सिराजने खरोखर चांगली गोलंदाजी केली आणि मला त्याची उर्जा पाहून खूप आवडली. त्याने स्वतःला पूर्णपणे व्यक्त केले. तो आता भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये हळूहळू दुसरा पसंतीचा गोलंदाज बनत आहे.”
Siraj brilliant love his energy to keep coming in a full tilt every ball and not afraid to express himself. Slowly pushing his way as India's second choice bowler in the XI. #INDvENG
— Brad Hogg (@Brad_Hogg) August 8, 2021
मोहम्मद सिराजने घेतल्या ६ सामन्यात १९ विकेट्स
नॉटिंघम कसोटी सामना सिराजच्या कारकिर्दीतील सहावा कसोटी सामना आहे आणि त्याने आतापर्यंत एकूण १९ विकेट्स घेतल्या आहेत. त्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध एका डावात ५ विकेट घेण्याचाही समावेश होता.
तसेच सिराज हा आक्रमक गोलंदाजही आहे, तो प्रतिस्पर्धी खेळाडूला जशास तसे उत्तर देतानाही दिसतो. नॉटिंघम कसोटीतही त्याचे इंग्लंडच्या खेळाडूंबरोबर खटके उडाले. सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लंडच्या डावाच्या ७४ व्या षटकादरम्यान त्याचा आणि इंग्लंडचा युवा खेळाडू सॅम करन यांच्यातही वाद झाला. झाले असे की इंग्लंडचा कर्णधार जो रूटने शतक पूर्ण केले होते आणि सॅम करन चांगला खेळत होता.
त्यावेळी सॅम करनने सिराजच्या चेंडूवर चौकार मारला आणि काही हातवारे केले. त्यानंतर सिराज त्याच्याकडे गेला आणि काहीतरी म्हणाला. सिराज आणि सॅम एकमेकांच्या अगदी जवळ आले आणि दोन्ही खेळाडूंमध्ये शब्दांचे युद्ध झाले. नंतर सॅम करनने सिराजला निघण्याचे संकेतही दिले. दरम्यान, दोन्ही संघांच्या कर्णधारांनी आपापल्या खेळाडूंना समजावले आणि नंतर प्रकरण मिटले. यानंतर सिराजने सॅम करनचा झेलही पकडला.
महत्त्वाच्या बातम्या –
विमानात एअर होस्टेसने सुरेश रैनाला म्हटले होते ‘मास्टर ब्लास्टर’चा मुलगा; सचिननेही घेतली होती मजा
जेव्हा एमएस धोनीने ‘या’ दिग्गजाचे न ऐकता केली होती दिनेश कार्तिकला गोलंदाजी; आता स्वत:च केलाय खुलासा
आयसीसीने ‘या’ बांगलादेशी खेळाडूला फटकारले; विकेट घेतल्यानंतर केली ‘मोठी’ चूक