सध्या भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आहे. पण कोहलीची सध्याचे धडाकेबाज खेळाडू जो रूट, स्टीव्ह स्मिथ, केन विल्यमसन या खेळाडूंशी तुलना केली जाते. या चार दिग्गज खेळाडूंमध्ये सर्वाधिक शानदार खेळाडू कोण आहे? यावर सारख्या चर्चा होत असतात. गेल्या काही दिवसांपासून इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट (Joe Root) चांगल्या फाॅर्ममध्ये दिसत आहे. दरम्यान आता कोहली आणि रूटबद्दल ऑस्ट्रेलियाच्या ॲडम गिलख्रिस्टने मोठे वक्तव्य केले आहे.
क्लब प्रेयरी फायर पाॅडकास्टमध्ये जेव्हा कोहली आणि रूट यांच्यामध्ये उत्कृष्ट खेळाडू कोण? असा वाद निर्माण झाला. त्यावेळी गिलख्रिस्टने विराट कोहलीला (Virat Kohli) टी20 आणि एकदिवसीय क्रिकेटमधील शानदार फलंदाज म्हटले आहे. पण जेव्हा कसोटी क्रिकेटबद्दल चर्चा सुरु झाली तेव्हा तो म्हणाला की, “गेल्या काही दिवसांपासून रूट कसोटीमध्ये चमकदार कामगिरी करत आहे. कसोटीमध्ये तो कोहलीपेक्षा उत्कृष्ट फलंदाज आहे.”
आस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीमध्ये रूट आणि कोहली यांच्यामध्ये उत्कृष्ट फलंदाज कोण? अशा चर्चा सुरु झाल्यावर ॲडम गिलख्रिस्ट म्हणाला, “विराट कोहली (Virat Kohli) ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार फलंदाजी करतो. तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध रूटपेक्षा उत्कृष्ट खेळाडू आहे. रूटने त्याच्या कसोटी आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत 34 शतके झळकावली आहेत. पण आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे त्याने एकही शतक अद्याप ऑस्ट्रेलियामध्ये लगावले नाही.”
सध्या कोहलीने 113 कसोटी सामने खेळले आणि त्यामध्ये 29 शतक झळकावले आहेत. त्यामध्ये 8,848 धावा ठोकल्या आहेत. कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 80 शतके झळकावली आहेत. तर जो रूटने 145 कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 34 शतके झळकावली आहेत. रूटने कसोटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 12,377 धावा केल्या आहेत. रूटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 शतके झळकावली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
पुन्हा टीम इंडियाची वाट खडतर; मोठ्या स्पर्धेपूर्वी ईशान किशन संघाबाहेर!
ऑस्ट्रेलियाची त्यांच्याच घरात पळता भुई थोडी करू; भारताच्या माजी संघ निवडकर्त्याचा विश्वास
उंची 6 फूट 7 इंच, अवघ्या 20 वर्षाचा गोलंदाज करणार इंग्लंडसाठी कसोटी पदार्पण!