---Advertisement---

AUS vs SA: WTC फायनल कोण जिंकणार? ‘या’ माजी दिग्गजाने केली मोठी भविष्यवाणी

On: शनिवार, जून 7, 2025 5:23 PM
---Advertisement---

Australia vs South Africa WTC Final: सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलची (WTC Final) उलटी गिनती सुरू झाली आहे. 11 जूनपासून ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात जेतेपदाचा सामना होणार आहे. फायनलमध्ये कांगारूंचा जबरदस्त रेकाॅर्ड पाहता, ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा फेव्हरिट मानला जात आहे. पण, अलिकडच्या काळात दक्षिण आफ्रिकेनेही अद्भुत क्रिकेट खेळले आहे. दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदाच डब्ल्यूटीसी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान, माजी ऑस्ट्रेलियाचे महान खेळाडू टॉम मूडी (Tom Moody) यांनी एक मोठी भविष्यवाणी केली आहे. दरम्यान यावेळी डब्ल्यूटीसीचे जेतेपद कोण उंचावेल त्या संघाचे नाव जाहीर केले आहे.

स्टार स्पोर्ट्सशी बोलताना टॉम मूडी म्हणाले, “ऑस्ट्रेलियाने मोठ्या स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण यश मिळवून आपली प्रतिष्ठा निर्माण केली आहे. आयसीसी स्पर्धांबद्दल बोलताना, संघ म्हणून ऑस्ट्रेलियाची कामगिरी खूप उंचावते. ऑस्ट्रेलियाला क्रिकेट स्पर्धांचे आव्हान असते आणि ते दबावाच्या सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी करतात. ते तुमच्या आत्मविश्वासावरही अवलंबून असते. संघातील अनेक खेळाडूंनी अनेक मोठ्या आयसीसी स्पर्धा जिंकल्या आहेत आणि जुन्या पिढीच्या कामगिरी पाहून ते मोठे झाले आहेत. ही विजयी मानसिकता त्यांच्या आत आहे. माझ्या मते, ऑस्ट्रेलियाला निश्चितच थोडा फायदा होईल, कारण गेल्या काही वर्षांत त्यांनी दक्षिण आफ्रिकेपेक्षा जास्त मोठे सामने खेळले आहेत.”

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जेतेपदाचे रक्षण करण्याच्या उद्देशाने ऑस्ट्रेलिया मैदानात उतरेल. कांगारू संघाने गेल्या वेळी देखील डब्ल्यूटीसीचे फायनलचे तिकीट बुक केले होते. जेतेपदाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 209 धावांनी हरवून जेतेपद पटकावले. त्याच वेळी, दक्षिण आफ्रिकेने प्रथमच डब्ल्यूटीसीच्या फायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. यादरम्यान कोणता संघ बाजी मारतो? हे पाहणे मनोरंजक ठरेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---